आता रोज बस ने जायला लागल्यामुळे माझ्या दृष्टीपथात बहुतेक रोजच काहीतरी नवीन येतच राहत. मागच्या दोन-तीन आठवड्यापासून असच काहीस आढळलं आणि म्हटलं लिहायलाच पाहिजे. म्हणून हा पंक्ती प्रपंच. तर त्याच असं झालं कि माझ्या नेहेमीच्या अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे मी जवळपास १०-१५ मिनिटे आधीच बस स्टॉप वर जाऊन पोचते. तर मी जेथे उभी राहते तेथे मागेच एक भलीमोठी सोसायटी आहे. त्यातून चाकरमाने रोजच ठराविक वेळी बाहेर पडतात आणि माझे चार डोळे असल्यामुळे बघितलं जातंच. तरणोपाय नाही ह्याला. दोन चारचाकी वाले अगदी एका पाठोपाठ रोज निघतात, एकाची गाडी नंबर बघून तर ८-१० वर्षांपूर्वी घेतलेली दिसते पण इतकी लख्ख ठेवली आहे कि ज्याचं नाव ते, जशी कि आत्ताच शो-रूम मधून बाहेर काढली आहे. संपूर्ण पारदर्शक काचा असल्यामुळे चालक जो मालक आहे तो हि दिसतो. आश्चर्याची गोष्ट अशी कि जसा शर्ट तसा मास्क, रोज हं, भला मोठा घराचा डब्बा आणि सांभाळून चालवलेली गाडी. अहाहा. मला तर योग्य शब्द सुचतच नाही आहेत. कारण? अगदी सोप्पं आहे, त्या गाडी नंतर ताबडतोब निघणारी गाडी नंबर नुसार अगदी सध्या घेतलेली आहे पण एक इंच देखील स्वच्छता नाही, बाप रे. आणि इतका भोंगा / हॉर्न सतत वाजवतात सोसायटी च्या बाहेर निघतांना, देवा, आणि गती म्हणजे तर कुठल्यातरी स्पर्धेत भाग घेतल्यासारखी. अवघडच आहे. अर्थात "व्यक्ती तितक्या प्रकृती" पण तरी देखील, साधारण वय सारखं, गाडीची लांबी रुंदी सारखी, एकाच सोसायटी राहणं म्हणजे साधारण वैचारिक पातळी पण सारखी असायला हवी, पण .... असो, ज्याचं त्याच्या बरोबर, पण ह्या दोघांकडून फारच शिकण्यासारखं आहे, काय करायचं आणि काय नाही ते देखील. कारण गाडी हि स्वच्छ असेल तर फक्त चालकाला नाही तर बघणाऱ्याला हि तितकीच स्फूर्ती देऊन जाते, एखाद्याला कदाचित मूड बदलण्यास हि कारणीभूत होऊ शकते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा