पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मी हैद्राबाद ला गेले होते,
अर्थात माझं तेथे सिलेक्शन झालं म्हणून आणि एक खास विशेष अभ्यासक्रम करता
आला म्हणून देखील. हैद्राबादला मी आमच्या संपूर्ण वर्गात एकाच नमुना होते,
मला तेलगू भाषा अजिबातच येत नव्हती. मी वसतिगृहात राहत होते आणि तेथे जी
जेवण देणारी मुलगी होती ती एका दुर्गम्य भागातून आल्यामुळे तिला फक्त आणि
फक्त तेलगूच येत होतं. मग काय "अडला हरी...", शिकले थोडंसं तेलगू, "काम
पुरता मामा...", बहुतेक जेवणाचे / खाण्याचे शब्द, रोज वापरातील वाक्य ई. मी
वसतिगृह ते कॉलेज आणि परत असा प्रवास बस ने करत असे. एकदा प्रचंड भरून बस
आली आणि मी शिरले त्यात, त्यामुळे फक्त चालकापाशीच जागा मिळाली उभं
राहायला. तेवढ्यात कंडक्टर आला, मी पास दाखवला आणि त्याला विचारलं कि
"तुम्हाला रात्री झोप येते का?... कि तुम्ही झोपेत पण तिकीट तिकीट असच बोलत
असता?" हे सगळं मी तेलगूत बोलले आणि त्यावरून म्हणते कशी कि मला अगदी थोडं
येत बरं का तेलगू, दोघेही पोट धरून कित्ती वेळ हसत होते. हम ...
आज
ह्या प्रसंगाची आठवण कशी झाली म्हणता? मी मागे लिहिल्याप्रमाणे, सध्या मी
जेवणाचा डब्बा, संगणक आणि अजून एक छोटीशी बॅग बाळगते, ज्यात माझा मोबाइल
आणि सॅनिटायझर असं काहिबाही असत. बस मध्ये जायच्या आधी आणि बसल्यावर
सॅनिटायझर काढतांना मला हा प्रसंग आठवला आणि उगाचच कंडक्टर नसतांना ती बॅग
बाळगते म्हणून कंडक्टर झाल्यासारखं वाटलं. अगदी तशीच एका खांद्यावर बाजूला
असते बॅग, त्यात थोडे पैसे, किल्ल्या असल्यामुळे खुळखुळतात देखील....
मज्जाच आली, संपूर्ण दोन वर्षाचे अनुभव / दिवस झर्रकन एखाद्या
चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे ठाकले. अहाहा. माझ्या बॅग ला धन्यवाद द्यावे
तेवढे अपुरेच आहेत. झकास सुरवात झाली दिवशीची आज. "आज मै उपर, आसमा
नीचे..." असं काहीसं.
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
कंडक्टर... conductor
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा