सातत्य हा गुरुमंत्र. वैविध्यता असावी कामात सतत, म्हणजे व्यग्र राहतो आपण, खाद्य असत डोक्याला आणि त्यामुळे शारीरिक + मानसिक स्वास्थ्य लाभतं, टिकतं आणि बहरतं सुद्धा. आणि असा प्रत्येक जण जर सुदृढ झाला आणि राहिला तर आपले कुटुंब, आणि देश देखील फारच प्रगती करेल ह्यात शंकाच नाही. कामात राहील कि नकळत मला असं वाटत कि व्यायाम देखील होतो, शारीरिक आणि मानसिक देखील आणि त्याचा परिणाम म्हणजे रात्रीची शांत झोप, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, योग्य दिशा धरून चालणे आणि बाकिच्यांना ह्या प्रवासात घेऊन जाणे, स्वतः सतत स्वयंप्रेरित राहता येत, दुसऱ्यांना प्रेरणा मिळते ते वेगळीच, आनंदी राहणं जगता येत, दुःख आलीच तर त्याला एक संधी म्हणून घेता येत आणि बरीच काही. बघा किती अगणित फायदे आहेत. आणि सगळ्याच संत महात्म्यांनी म्हटलंच आहे ना कि एक व्यक्ती जर सुखी, समाधानी आणि आनंदी तर त्याच्या आजूबाजूचे असंख्य जण पण तसेच होतात च. आणि हो काम करत राहिलं कि अनेक दिशा दृष्टीपथात पडतात, मार्ग सापडतातच आणि तुम्ही अनेक जणांसाठी एक आदर्श उदाहरण होता. संपूर्ण जगात असे असंख्य प्रस्थापित उदाहरणं आहेतच आणि पुढे अश्या कामाला मनापासून पूजा मानणाऱ्या व्यक्तिमत्व घडतीलच ह्यात वादच नाही. मानसिक पूजा तेथे समाधान आणि शांतता, नाही का, म्हणजे काम केलं कि calm होता येताच.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा