सोमवार, १५ मार्च, २०२१

तरुण पिढी आणि गॅझेट...

माझं साधारणतः जे निरीक्षण आहे, जे ऐकतो / वाचतो, अनुभवतो त्यानुसार नवीन पिढी हि सततच गॅझेट वापरात असते, कुठले-ना कुठले उपकरण वापरणारच. कशासाठी? सोशल नेटवर्किंग, गाणे ऐकणे, फोटो टाकणे, वेब सिरीज बघणे, चित्रपट बघणे, रियालिटी शोज ई. मला नक्की माहित नाही. पण अभ्यासासाठी लॅपटॉप चा वापर झाला कि किंवा त्याच्या अधेमधे मोबाइल, त्या नंतर किंवा सोबतच स्मार्ट घड्याळ, काही ठिकाणी टच स्क्रीन जेथे-तेथे त्यामुळे मग ते ई. अगदी तस्सेच मी सध्या अनुभवते आहे. मला मधे कुणी तरी म्हटलं होत कि निवृत्त झालेले / सिनियर सिटिझन पण काही कमी नाहीत, त्यावेळी मला ते पटलं नव्हतं पण आता...  सक्काळी पाय अंथरुणातून जमिनीवर टेकण्या आधीच रेडिओ "भुले बिसरे गीत" मोठ्याने, मग बातम्या आधी रेडिओ वर मग दूरध्वनी, ते सगळं चालू असतांनाच वर्तमान पत्र आणि त्या वर चर्चा विथ चहा बिस्किट. काही मिनिटांची आंघोळ पूजा झाली कि पुन्हा टीव्ही चित्रपट, मग जेवण आणि वामकुक्षीच्या आधी रेडिओ जुने गाणे. उठायच्या आधीच जणू पुन्हा रेडिओ किंवा टीव्ही भांडाभांडी बातम्या / क्रिकेट साधारणतः ८-१० तास, त्याच्या जाहिरातीमध्ये बातम्या / सिरीयल / चित्रपट ई.  मग ३ तास सलग मराठी सिरियल्स, आणि सरते शेवटी जेवण झालं कि तो डोक्याला ताप "अनु कपूर" घेऊन येतो एका कलाकाराला प्रत्येक दिवशी खास. उगाचच नवीन पिढीच्या नावाने खडे फोडायचे. नवीन पिढी स्वतः तरी ऐकते आपआपले कानात घालून.  देवा, कुठे आहेस बाबा तू?

हे सगळं अनुभवताना दररोज, क्षणोक्षणी माझे बाबा मला आठवतात. जर ते असते माझ्या कडे राहायला आत्ता तर ते मी आधीही लिहिल्याप्रमाणे सर्वांच्या आधी उठून आवाज न करता त्यांचं आवरणार, मग चहा करणार, करता करता काही तरी भाजी चिरून ठेवणार, मग शांतपणे उन्हात बसून थोडाच वेळ पेपर चाळणार, माझ्या किंवा मुलांच्या पाण्याची बाटली भरून ठेवणार, चुपचाप एक छोटेखानी बिस्किटाचा पुडा बॅग मधे ठेवणार, गप्पा मारणार, झाडांची निगा राखणार, व्यायाम म्हणून अंगण झाडणार, भाजी / खाऊ / फळं / आईस्क्रीम / मिठाई ई. आणणार, ती भाजी निवडून ठेवणार, थोडी झेपेल तेवढी साफसफाई करणार, आई ग, लिस्ट फारच मोठी आहे. लिहिणार, टिपून ठेवणार, खूण केलेलं वाच म्हणून सांगणार मला आणि स्वतः देखील नर्रेट करणारच.  टीव्ही न चुकता फक्त ७-७.१५ संध्याकाळी ठळक बातम्या बास. खूपखूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून, नेहेमीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...