सोमवार, १५ मार्च, २०२१

फुलांच्या वेणीचे मोहक दिवस ...

माझ्या लहानपणी बहुतेक सगळ्याच मुली, त्यांच्या आया आणि शेजारी पाजारी काकू / मावशी ई.  बहुतेक लांब केसांची वेणीचं घालत असतं, केस कापण्याची पद्धत नव्हतीच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शाळेचे नियम वेणी, रिबन घालण्याचे आणि सगळ्याच घरी सारखं वातावरण असायचं बहुतांशी त्यामुळे सगळे सण साजरे होत असतं, आणि सण म्हटलं कि मेहूण, कुमारिका बोलावणं, गोड-धोड करणं हे सगळं यायचंच. त्यामुळे प्रत्येक सणाच्या आधी बाजार अगदी फुलांनी, आणि बाकी पूजेच्या साहित्यांनी बहरून जायचा. त्यात माझ्या सगळ्यात आवडीचं होत ते म्हणजे मोठ्यांचे सगळे खरेदी करेपर्यंत मनसोक्त शेवंतीच्या वेण्या ज्याला विविध रंगांच्या चमक्या / चमकणारा कागद लावलेला असायचा ते न्याहाळत उभं राहायचं, आणि "चेरी व केक" म्हणजे जर तो फुल वाला / वाली जर तो गजरा त्या वेळी तय्यार करत असेल तर प्रचंड परमानंद होत असे सगळी प्रोसेस बघून, त्यांची वैशिठ्य पद्धत बघून. मला पण एक वेणी मिळायची आणि ती प्रत्येक वेळा मी फा$$$रच लकी असल्यामुळे दोन वेगळ्या रंगांच्या चमक्या लावलेली मिळायचीच. अहाहा. स्वर्ग जणू, आनंद गगनात मावत नसे माझा.  त्या नंतर मोगऱ्याचा / जाईजुई ई. गजरा असायचा. पण माझं मनापासून प्रेम त्या चमकीवाल्या वेणीवरच. केसांची लांबी रुंदी कमी झाली तशी ह्या वेण्यांची प्रसिद्धी आणि उपस्थिती देखील नाहीशी झाली हो.

मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी म्हणून दक्षिणेकडे गेले आणि तेथे भले मोठे बेंडोळे बघितले जिथेतिथे, अबोलीचे, जाईजुईचे, मोगऱ्याचे ई. तेथे फुटावर गजरे हवे तसे कापून मिळतात.

"गो विथ विथ द फ्लो" पद्धतीने सध्या साडी नेसली, काही प्रसंगाला जायची वेळ आलीच कि मी गुलाबाचं विशिष्ट फुल असलेली क्लिप लावते, बास.

शेवंतीची वेणी - जाईजुईचा दाट गजरा - प्लास्टिक फुलाची क्लिप हा प्रवास मी अगदी आनंदाने उपभोगला आहे, ह्याच एका उभ्या छोट्याश्या आयुष्यात. आत्ता ह्या क्षणी हे थोडक्यात वर्णन लिहितांना मी माझ्या आई बाबांसोबत गोकुळपेठ बाजारात शेवंतीचा गजरा बघत उभी आहे. भन्नाट. 

For more such Anukatha, find me on Facebook: www.facebook.com/preeti.mulay


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...