काल माझा नेहेमी प्रमाणे पहाटे दिवस सुरु झाला आणि थोडासा योग, स्वयंपाक घरात काम ई. झाल्यावर ऑफीच मिटिंग, लेक्टर्स वगैरे जे सुरु झाले ते दिवसभर सुरूच होते. संध्याकाळी पुन्हा चहा, झाडांना पाणी उन्हाळा असल्यामुळे, गेट धुणे अधूनमधून धूळ बसते त्यामुळे, त्यावेळी शेजाऱ्यांशी बोलणं ई, मग शुभंकरोती, स्वयंपाक, जेवणं आणि शतपाऊली हे सगळं करता आलं. दिवस अगदी भन्नाट वर्तमानपत्र चाळून सुरु झाला, रात्री सविस्तर वाचण्यात आला. शतपाऊली लेका बरोबर करता आली.
हे सगळं साग्रसंगीत करता आलं ह्याच महत्वाचं कारण म्हणजे
माझं काल "वर्क फ्रॉम होम (Work From Home)" होत. मला शारीरिक धावपळ नव्हती घडाळ्याच्या काट्यावर चालणारी. त्यामुळे ताबडतोब माझ्या पायांनी मला कळवलं च कित्ती अप्रतिम वाटतंय त्यांना ते.
मी घरी असल्यामुळे आणि पायांना आराम मिळाल्यामुळे लेक फायनल प्रॅक्टिकल परिक्षा देऊन आल्या आल्या तिला गरम गरम खायला करून देता आलं.
छोटीशी गोष्ट आहे पण मला हा बदल फारच भावला आणि माझ्या दृष्टीने सुखाची नवीन छोटीशी परिभाषा कळली नव्याने म्हणून हा पंक्तिप्रपंच.
"पाय सलामत तो काम पचास".
सुख म्हणजे नक्की काय असतं....
Listen to this story on YouTube, click this link: https://youtu.be/nizFV00tNyw
Replica of it on Twitter too : https://twitter.com/DrPreetiMulay
Find me on Facebook too.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा