गुरुवार, ६ मे, २०२१

"जिनके घर शीशेके होते है वो दूसरोंके घर पत्थर नही फेका करते..."

हा फारच फेमस डायलॉग आहे एका चित्रपटाला, आठवतोय का मंडळी? आज त्या बद्दल बोलूयात थोडक्यात.

आमच्याच परिचयाचे एक दोन कुटुंब आहेत जे शहरात राहतात, व्यवस्थित शिकले सवरलेले आहेत, पैसा असावा पण राहणीमान अगदी म्हणजे अगदीच साधं. इतकं साधं कि फक्त अतिआवश्यक गोष्टीच आहेत त्या घरात, कुठलीही चैनीची वस्तू नाही म्हणजे नाही. अर्थात आधी ज्या चैनीच्या वस्तू वाटत होत्या त्या आता गरजेच्या झाल्या आहेत आणि हा प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन आहे. ज्याला जस हवं तसं, खिशाला आणि प्रकृतीला रुचेल+पचेल असेच राहायला हवे, ह्यात काही$$$$ दुमत नाहीच माझं. प्रत्येक अती छोट्या आकाराच्या खोलीत एक अगदी छोटा दिवा, अनेक पिढ्यांपूर्वी लावलेला पंखा, दोनच शेगड्यांचा गॅस तो हि अगदी अंधाऱ्या स्वयंपाक घरात ई. अर्थात जेव्हा पूर्वी ते घर बांधलं असेल तेव्हा असच काहीस असायचं घर असं समजू या. खैर. डोक्यावर छप्पर आणि बेसिक गोष्टी आहेत हे खूप आहे, असं मी बघते ह्या सगळ्यांकडे. असो. 

ह्याच घरात राहणारी मंडळी माझ्या घरी आली तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. आले रे आले कि ताबडतोब "बाप रे काय गर्मी आहे तुझ्या घरात, एअर कंडिशनर नाही वाटत चालू, आहे का नाही बसवलेला?". दुसऱ्यांदा आले तेव्हा मी त्यांच्याच साठी स्वयंपाक करत होते तर पुन्हा सुरु "चिमणी नाही बसवली का स्वयंपाक घरात? काय हे, कित्ती खोकला येतोय". मला हसू आलं फक्त. बघा कोण बोलतंय ते. अश्या लोकांना मी उत्तर देत नसते अजिबात, कारण त्यांच्या घरी काय आहे हे मला ठाऊक असल्यामुळे आणि आता त्यांचा स्वभाव पूर्णपणे लक्षात आल्यामुळे, आपल्या तोंडाची वाफ वाया जाऊ द्यायची नाही आणि मग हळू हळू मी सगळं कमी केलं / झालं ते वेगळं. पण कशी माणसं असतात नाही ह्या जगात, कित्ती शिकायला मिळत त्यांच्या कडून कि कसं वागायचं नाही ते.

"असे पाहुणे येति आणिक (नको त्या) स्मृती ठेवुनी जाती". 

Listen to this story in my voice on : https://youtu.be/uSW8iteDu0k

Also on Twitter and Facebook too.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...