मला आज नव्याने साक्षात्कार झाला आणि प्लास्टिक / लाकडी चमच्याचे महत्व समजलं / पटलं. मला आता पर्यंत हेच माहिती होत कि डिस्पोजेबल ताटली, वाट्या, पेले, चमचे ई. मोठ्या प्रमाणात पार्टी करायची झाली तर उपयोगी पडतात, कारण ते विकत आणायला सोप्पे आणि वापरून झाल्यावर फेकून देता येतात, घासत बसण्याची गरज नाहीच.
किंवा ऑफिस, ट्रिप, सहल ई. ठिकाणी पण सोप्प जात अश्या डिस्पोजेबल वस्तूंमुळे. असो.
पण इतक्यात मला एक नवीन गोष्ट ध्यानात आली कि घरी अथवा दारी, अनेक दिग्गजांसोबत लंच-मिटिंग असते तेव्हा, खातांना / जेवतांना काही अलिखित नियम असतात, तोंडाचा आणि चमच्यांचा आवाज न करण्यासाठी.
बरोबर?.
तर असे डिस्पोजेबल चमचे तारणहार ठरतात, कारण आवाज करण्याची सवय एकदा जडली कि........ जाऊ दे, तर अश्या व्यक्ती शांतपणे प्लास्टिक / लाकडी चमचे वापरून मिटिंग ची शान बनु शकतात कारण आवाज येत नाहीच ना असे हलके फुलके चमचे वापरले कि. आहे कि नाही भन्नाट. तेव्हा आता मला समजलं कि डिस्पोजेबल खरं तर का शोधून काढले होते ते, अश्या आवाज-सम्राटांना मदत करण्यासाठीच जणू.
Listen to this story by clicking on : https://youtu.be/exMRaWCI4JM
Also on Twitter and Facebook.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा