मंगळवार, ४ मे, २०२१

पोळीचा घास...

कदाचित माझ्या लहानपणी मी अनेक वर्ष पंगतीत जेवले आहे म्हणून असेल, किंवा अनेकदा ऐकलं / वाचलं / बघितलं / वेचलं असेल, आठवत नाही नक्की, पण हे पक्क कुठे तरी बिंबले मनावर कि पोळी चे घास करण्याची एक विशिष्ट पद्धत असते ते. कधीही कुठे हि असलातरी पोळी हि विशिष्ट पद्धतीनेच तोडली जाते आणि घास केले जातात. एकाच हाताने, ठराविक तीन आणि त्याचे पुन्हा तीन असे सहा भाग. बास. कसेही हाताळता येत नाही पोळीला, माझ्या दृष्टीने. तुम्ही कधीच पंगतीत किंवा डायनींग टेबल वर बसले असतांना फक्त तुमच्यासाठी जेवत नाही समोरच्याचा पण विचार रादर समोरच्याचं विचार पहिल्यांदा करणं महद आवश्यक आहेच. ह्या शिवाय पण काही छोटुकले पण महत्वाचे "टेबल एटीकेट्स" असतातच.

नोकरी करू लागले, अनेक शहरात जाणं झालं, अनेक जणांबरोबर जेवण्याचा आनंद उपभोगला आणि प्रकर्षाने पुन्हा एकदा / अनेकदा जाणवलं पोळीचा घास सुबक सुंदर आणि विशिष्ट पद्धतीने करण्याचं महत्व. माझ्या मुलांना पण मग सांगितलं हे सगळं, ते आपेआपे खायला लागल्यापासून. आणि हो ते लहान असतांना त्यांच्या डब्यात मी असेच "गुड लुकिंग" पोळीचे घास करून देत असे आणि त्यांना देखील फार पटलं त्यामुळे ते पण रोज फॉलो करतातच आपोआप.

मी काही असे अवलिया बघितले आहेत कि जे ताजी पोळी चे घास असे करतात जसे कि कित्ती शिळी पोळी दिली आहे ते, जोर$$$$$ लावून हेकड-वाकडं ....... जाऊ दे. प्रत्येक छोट्या कृतीला आपल्याकडे किती महत्व आहे ना. सहीच. 

Listen to this : https://youtu.be/gj7TncxCFas

Also find  me on Twitter and Facebook too.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...