वार्णिक वेद लहान असतांना आम्हाला असं जाणवलं कि त्यांना फारच वारंवार सर्दी होत आहे. एकाला झाली कि नॅचरली दुसऱ्यालाही होत असे आणि त्यानंतर घसा, ताप ई. मग असं वाटलं कि बहुतेक दुधामुळे होत आहे जास्त त्रास कारण असं वाचनात होत कि दुधामुळे कफ जास्त दिवस राहतो वगैरे. मग आम्ही त्यांना छान आल्याचा चहा लवकर इन्ट्रोड्युस केला. त्याआधी कधी कधी "डिप-डिप" म्हणत एखादवेळा बिस्कीट बुडवून खात असतं ते माझ्या चहाच्या कपात, पण नुसता चहा चाखला नव्हता तोवर.
सर्दी झाली कि मग छोट्याश्या कपात मी चहा देत असे त्यांना, त्यांचा. आधीच सर्दी आणि त्यात कप हातात धरून पिणं त्यांचं त्यांना अवघड होत थोडं त्यामुळे मग मी चमचा वापरून त्यांना भरवत असे, थोडेसे कौतुक तर होतेच त्याबरोबर. त्या नंतर मोठा झाल्यावर देखील वेद कित्येक वर्ष चमच्याने चहा पिणे एन्जॉय करत असे. अहाहा. त्यांचे बाबा ओरडायचे मला अशी सवय लावली आहे म्हणून, कित्ती वेळ पितोय चहा तो वगैरे पण असो, आज इतक्या वर्षांनी पण मला आठवून लिहिता आलं ना त्यामुळं हि अनुकथा. भन्नाट छोटासा अनुभव आणि आठवणी सुद्धा. धन्यवाद पिल्लानो.
मंगळवार, ४ मे, २०२१
कप चमचा...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा