गेल्या वर्षभरात माझी अनेक वैद्य / डॉक्टर शी भेट आणि चर्चा झाली. कधी नव्हे ते इतक्या विविध डॉक्टर च्या पायऱ्या चढले. बरेच चांगले अनुभवही आले, किंबहुना थोडसं आता बरंही वाटतंय मला. पण ह्या सगळ्या वैविध दिग्गज डॉक्टरांना भेटल्यावर अनेक विचार मनात आलेत, ते कितपत योग्य आहेत मला माहित नाही. पण आले खरे आणि त्यामुळे मी ते इथे मांडते आहे. रुग्ण बरा होण्यात डॉक्टर च्या तपासाच्या वेळेचा मूड किती महत्वाचा असतो? त्याच्या मनात चालेल वादळ, किंवा शांतता, त्यांचा दिवस कसा सुरु झाला आहे, त्यांची जडण-घडण कशी आहे, त्यांचा वैद्यकीय व्यवसायाचा उद्देश काय आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या घरच वातावरण कसं आहे आणि असे अनेक प्रश्न पडलेत मला.
मला
शंका आहे
असं
नाही पण कधी कधी डॉक्टर बद्दल बराच वाचून, ऐकून गेल्यावर देखील मला भलतेच अनुभव आले आहेत. म्हणून म्हटलं माझ्या FB मित्रांना, blog readers ना विचारावं ..
एका प्रसिद्ध वैद्याने माझी सखोल नाडी परीक्षा केली आणि काही दिवसांनी औषधं आणून दिली हजारो रुपयांची. आणि त्यानंतर साधा एक फोन नाही, चौकशी तर सोडाच. असो. मागल्या जन्मी त्या वैद्यांकडून मी घेतले असतील हे रुपये, जे मी परत केले. बास, बाकी त्यांचं त्यांच्या बरोबर. असो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा