मंगळवार, १८ मे, २०२१

१८ पायऱ्याचं दिव्य...


आम्ही सध्या श्री. दत्त जयंती च्या निमित्य होणाऱ्या भजन कार्यक्रमाची जय्यत तय्यारी करत आहोत. ह्या वर्षी बहुतेक सगळ्यां कडे जाऊन सराव करणं सुरु आहे, प्रत्येक भक्त उत्सुकतेने सेवा करत आहेत. काल आम्ही श्री. पोळ काका ह्यांच्या कडे गेलो. त्यांनी प्रचंड उत्साहानी माझं स्वागत केलं आणि भरभर जिना चढू लागले. आणि त्या वेळी माझी ट्यूब पेटली कि आता काय करायचं, पायऱ्या कश्या चढायच्या. काकांनाही फारच वाईट वाटलं. म्हणाले आमच्या कडे लिफ्ट नाही आणि आम्हाला कोणालाच लक्षात आले नाही कि मला अजूनही पायऱ्या चढता येत नाहीत. काहीच सुचत नव्हतं. काका म्हणाले कि आपण शलाका ताई येईस्तोवर वाट बघू, त्या काहीतरी उपाय सुचवतील. शलाका ताई आल्या आणि काही क्षणात उपाय सुचवला देखील. मी लहानपणापासून इतक्या वर्षात कधीच विचारही आणि कृतीही केली नव्हती अश्या पद्धतीने यशश्वी रीतीने अख्खा जिना बसून चढले. मी निःशब्द झाले. आमच्या शलाका ताई म्हणजे एक जगावेगळं व्यक्तिमत्व आहेतच पण त्यांना हे कसं सुचलं हे एक कोडंच आहे बुवा. केवळ त्यांच्या मुळे माझा कालचा दिवस अविस्मरणीय झाला. शतशः धन्यवाद ताई.

Published on FB during Dec'19.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...