मला ह्या वर्षी थोडासा आश्चर्याचा धक्का बसला कारणं दोन आहेत.
१. मला ह्या ईद ला स्पेशल शीर खुरमा खायला मिळाला, न मागता. अहाहा, अचानक, सरप्राईज होत मला मोठं. मज्जा आली.
२. ह्या आधी दोन-तीन वेळा खाण्यात आली होती हि डिश जी कि माझ्या साठी शेवयाची खीर होती. पण एवढ्यात जे खाल्लं त्यात शेवया, दूध, सुकामेवा ई. तर होतंच पण शिवाय भरपूर अतिशय शिताफीने बारीक चिरलेली फळं पण होती. हे व्हर्जन मी कधीही चाखलं नव्हतं. काय मज्जा आली म्हणून सांगते. उगाचच ह्यात हे नाही ते का असलं मी करत बसले नाही कारण वेळच नव्हता नेवढा. आयतं हातात इतकं भन्नाट काही असतांना माझी काय बिशाद कि मला प्रश्न पडतील. ज्यांनी मला हि ट्रीट दिली त्यांना मग मी विचारलं तर त्या म्हणाल्या "आमच्या गावी अशीच पद्धत आहे, दुधाबरोबर जी फळं जातात ती देखील खीर थंड झाल्यावर घातली जातात बाकी जिन्नसांबरोबर".
मला त्यामुळे आता एक नवीन गोड पदार्थाची कृती समजली. आता पुढल्यावेळी लवकरच मी पण करणार शेवया खीर विथ खूप सारे ड्राय फ्रुटस, फ्रुटस, दूध, आणि भरपूर प्रेम अशी. या सगळे, एकत्र खाऊ आणि मज्जा करू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा