माझ्या एका मैत्रिणीची अजिबोगरीब सवय आहे, तिला उन्ह्याळ्यात दररोज आईस्क्रीम लागतंच खायला आणि हे प्रमाण जरा जास्तच वाढलं जेव्हा तिला डायबेटिस डिटेक्ट झाला. बाहेरचे साखर विरहित आईस्क्रीम आणून खाऊन बघितले पण नाही आवडले. मग तिने एक शक्कल लढवली आणि डॉक्टर च्या कानावर घालून घरीच आईस्क्रीम तयार करण्याचं ठरवलं. केलं, आणि ते फारच आवडलं तिला आणि अर्थात सगळ्यांनाच. मग काय "नो लूकिंग बॅक". रोज आता ती घरी चिक्कू आईस्क्रीम करते आणि मनसोक्त खाते, साखरविरहित. एकटीला करायचं झालं तर आकाराप्रमाणे एक किंवा जास्तीत जास्त दोन चिक्कू लागतात तिच्या हिशोबाप्रमाणे. मला तिने तिची साधी सोप्पी कृती सांगितली. आधी दूध भरपूर उकळा, दाट होऊ ह्या, त्यात थंड झाल्यावर चिक्कू मिसळा आणि ठेवा बर्फ होण्यास. २-३ तासानी फस्त करा. अगदीच वेळ असेल तर एकदा बर्फ झालेलं मिक्सर मधून फिरवून घ्या, पुन्हा फ्रिज मधे ठेवा ई. हे सगळं ती सांगत होती तेव्हा मला अजून एक कृती करून बघावीशी वाटली. "प्रयोगातून विज्ञान" ह्या पद्धतीने आणि अजूनच सोप्पी. नरसोबावाडीची बासुंदी आणायची, त्यात थोडं दूध घालावेच लागते, आणि त्यात जर चिक्कू घालून करून फ्रिज मध्ये ठेऊन बघितलं तर? छान लागेल माझ्या मते. लवकरच करते आणि तुम्हाला कळवते देखील माझी नवीन न गॅस वापरता केलेल्या आईस्क्रीम ची अनोखी कृती.
बुधवार, १९ मे, २०२१
चिक्कू आईस्क्रीम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा