मला
सगळ्यात पहिल्यांदा ज्याने शिक्षिका केले / हा छोटेखानी खिताब दिला तो नुकताच बाबा झालाय. बाकीही पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेले माझे विदयार्थी आई बाबा झालेत पण ते भारतीय आहेत. भारतीयांशिवाय सगळ्यात मोठा जथ्था जो सिम्बिओसिस मधे पदव्युत्तर अभ्यासक्रम करायला आला होता ते इथिओपिया ह्या देशातले होते. त्यांची एक खास सवय होती. माझे इथिओपियातन आलेले सगळे विदयार्थी मेल लिहितांना "प्रिय आई" / "Dear
Mom" असं
लिहीत असत, "Dear Mam" नाही. त्या मुळे कोणे एके
काळी (२०१६-१८ मधे) मी ३९ जणांची आई होते. त्यातल्याच दोघांनी लग्न केलं आणि कन्यारत्न प्राप्त झाले ज्यामुळे मी एवढ्यातच "आंतराष्ट्रीय आजी" झाले, कारण दोन्ही आई आणि बाबा माझेच विदयार्थी होते. सद्य स्थितीत मला अर्धा डझन नातवंड आहे. माझी मनापासून इच्छा आहे कि मला प्रत्येकाचे फोटो मिळावेत म्हणजे मी त्यांना एकत्र करेन, ज्यात त्यांचे वैविध्य दिसून येईल, केश रचना, त्वचा रंग, डोळे ई. अहाहा.
This tiny story is published on FB on 29th Nov 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा