बुधवार, १९ मे, २०२१

चमू अक्का संघ ...

आम्ही लहान असतांना रवीनगर मधे मागे पुढे भलं मोठं आंगण होत. त्यामुळे दिवाळी किंवा कोणत्याही सणाला रांगोळी काढण्याचा उच्च कोटींचा उत्साह असायचा. आवडही होती, साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आणि मुख्य म्हणजे समवयस्क अशी चमू होती. त्या चमूत कोणी ठिपके काढण्यात तरबेज, तर कोणी रेषा ओढण्यात, तर बाकी अप्रतिम रंग भरण्यात तर बाकीच्या पुन्हा एकदा रेषा / शेवटचा हात फिरवण्यात. अहाहा. काय ते टीम-वर्क होत म्हणून सांगू. जागावेगळंच. मुख्य म्हणजे कोणालाच सांगावं लागत नसे. इतकी गती होती हातात कि ज्याचं नाव ते. सगळ्या गल्लीतल्या घरी, म्हणजे सर्व मैत्रिणीच्या घरी अश्या पद्धतीने कधी मोठ्या च्या मोठ्या रांगोळ्या काढून व्हायच्या हे कळायचं देखील नाही. उत्साहाने भरपूर असे दिवस होते ते. मला कधीच आठवत नाही कि मी एकटीने रांगोळी काढली ते. अश्या सगळ्या आठवणी काढत काढत मी आजची रांगोळी पूर्ण केली आणि हा सगळा वृत्तांत अगदी सविस्तर पोरांना सांगितलंही आणि आता इथे लिहिते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...