बुधवार, १९ मे, २०२१

कुंची...


कुंची हि एक महत्वाची वस्तू होती माझ्या आणि माझ्या मुलांच्या लहानपणी. कित्येक फोटो आणि लोक त्याची साक्ष आहेत. आणि मला अशी खात्री आहे कि प्रत्येक जण कुंची फक्त एकदाच / एकाच टप्प्यात म्हणजे लहानपणीच घालतात. पण नाही हो. मी अजूनही घालते कुंची. अगदी बरोबर वाचलत मंडळी. हो मी अजूनही घालते. माझ्या पायांच्या सद्यस्थितीत मी बहूतांशी ऑटोनीच जाते येते, गाडी काढत नाही. थंडी म्हणून किंवा कानाला वारा लागू नये म्हणून फक्त कान झाकावेसे वाटतत तेव्हा मी माझं जॅकेट पूर्ण घालत नाही, फक्त टोपी घालते. म्हणजे अगदी कुंची सारखं, फक्त डोक्यावर हूड आणि जी जॅकेट ला जोडलेली दोरी असते ती वापरून कुंची सारखे त्याचे बंद बांधते. मनातल्या मनात फारच आनंद होतो आणि पुन्हा छोटं झाल्यासारख वाटत. अर्थात हि माझी कुंची आधुनिक आहे, माझ्या कचेरीच नाव छापलेलं आहे ई. , खणाचे काठ नाहीत, आई बाबाचा खांदा तर नाहीच नाही पण, उब आहे आणि पुन्हा मला माझं बालपण असं अद्वितीय पणे जगता येतंय ह्याच आनंद. अहाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...