बुधवार, १९ मे, २०२१

आजी ...


नोव्हेंबर २०१९ हा दिवस एक जगावेगळाच आनंद घेउनच उगवला. मी पुन्हा एकदा आजी झाले त्या दिवशी. माझ्या मोठ्या दिरांना (आणि मलाही) नात झाली, पुन्हा एकदा. अहाहा. त्या परीचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

काव्या माझी मोठी नात. ती थोडीशी मोठी झाल्यावर माझी जेव्हा ओळख करून दिली "आजी" म्हणून तेव्हा तिचा चेहेराच जे बोलून गेला तेच पुरेसं होत मला / आम्हाला. तिने तिच्या आजीकडे बघितलं जी बरेचदा साडी नेसते, आणि एकंदरीत तिच्या साठी आजी दिसते आणि त्यानंतर मला पाहिलं. ड्रेस घातलेली मी आजी पटलेली दिसत नव्हती तिला. आता ह्या नवीन पिल्लू ची बारी. अहाहा. अवघड आहे वाट बघणं. लवकर मोठी हो गं.

अमेरिकेत पहिल्या दिवशी जेव्हा प्राध्यापक वर्गात येतात तेव्हा सांगतात कि त्यांना कोणत्या नावाने संबोधायचं ते. तसेच आता मला पण सांगावं वाटत ह्या नातींना कि मला फक्त नावानेच बोलवा ते.

माझ्या पहिल्या वाहिल्या नोकरीत माझे सहकारी एक प्राध्यापक आणि मॅडम चा मुलगा होता, फार लहान. तो मला नावानेच हाक मारायचा. माझ्या एका भावाचा मुलगा माझ्या लग्नात नुकताच बोलायला लागला होता, पाय फुटले होते, तो हि अगदी उंच स्वरात, खणखणीत, आणि हक्काने मला नावानेच हाक मारायचा. का कुणास ठाऊक, पण मस्त वाटायचं मला. अहाहा. ह्या सगळ्या दिवसांची गोड आठवण झाली, ह्या नवीन परी च्या आगमनाने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...