माझं तसं
लहानपणीच शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं, फक्त काही विषय हे इंग्रजी भाषेतून शिकवले जायचे. त्यामुळे किंवा घरात-दारात, सर्वत्र त्यावेळी बहूतांशी मराठमोळ वातावरण असल्या मुळे माझं इंग्रजी जरा असं तसंच होत आणि आहे. प्रत्येकाचे इंग्रजी शब्द मला यायचे नाहीत आणि लक्षात तर मुळीच राहायचे नाहीत. त्या काळी नागपुरात रस्त्यावर काही ठिकाणी छोटे-छोटे एका पाठोपाठ एक असे गतिरोधक बसवले होते. अजून काही ठिकाणी, रिंगरोड ई. रस्त्यावर वर हि तसेच गतिरोधक होते. त्यावरून गाडी गेली कि ठराविक खडखड आणि धडधड असा वेगळाच आवाज यायचा. माझ्या ते इतकं तोंडात बसलंय कि इतक्यातच आमच्या विश्वविद्यालय जवळ नवीन पद्धतीचे पण तसेच गतिरोधक बसवले आहेत. त्यावरून जाताना माझं लहानपण रोज आठवत मला. मी माझ्या बाबांनाही सांगायचे कि आता थोडं पुढे खडखड-धडधड येणार आहे हं... स्पीड ब्रेकर म्हणावं किनी, पण नाही.
काहीही प्रतिशब्द वापरायचे मी. कुठे speed-breaker आणि
कुठे खडखड-धडधड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा