रविवार, १६ मे, २०२१

दुष्काळात तेरावा महिना ...

ज्या दिवशी देश बंदच आवाहन पहिल्यांदा झालं, नेमकं त्याच दिवशी आमच्या कडचं कपडे धुण्याचं यंत्र बंद पडलं. आणि सगळंच बंद असल्यामुळे हाताने कपडे manually धुण्याशिवाय उपायच नव्हता. झालं अजून एक काम वाढलं पण अर्थात तेवढाच व्यायाम होत आहे रोजचा रोज, चुकता. काही दिवस आम्ही रिन साबणाची वडी वापरली कपडे धुण्याकरता पण त्यानंतर मी कपडे साबणात भिजवणे पसंद केले. बाहेर कुठेच पडत नसल्यामुळे सध्यातरी फक्त घरचेच कपडे आहेत धुवायला आणि जास्त पडतात उन्हाळ्या मुळे. काही दिवसापासून मी जरा बारीक लक्ष ठेवून धुते कपडे तेव्हा प्रकर्षाने असं लक्षात आलं कि एकाच साबणाच्या पाण्यात भिजवलेले सगळेच कपडे एकसारखे साबण शोषून घेत नाहीत, जरी सगळेच कपडे सुती आहेत. प्रत्येकाची साबण शोषून घेण्याची ताकद, क्षमता वेगळीच असते. असं माणसांनी पण राहायला पाहिजे समाजात, घरात, कचेरीत वगैरे, सगळ्यांमध्ये एकत्र पण प्रत्येकां कडून हवं तेवढंच घ्यायचं. जीवन फारच सुखकर होईल, नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...