आम्ही जेव्हा आमच्या घराची बालकनी पत्रे टाकून झाकायची ठरवली तेव्हा माझ्या ह्यांनी मला दोन पर्याय दाखवले, एक होता लोखंडी पत्रा आणि दुसरा पारदर्शक (एक वेगळंच प्रकरण, कशाने तयार केला हे काही मी खोलात गेले नाही). मी अर्थातच पारदर्शक निवडला आणि त्यामुळे उन्ह्याळात आणि हिवाळ्यात दिवसभर उजेड असतो, अंधार राहात नाही सततचा त्या भागात. आम्ही त्याचा पुरेपूर आनंद उपभोगत होतो तेव्हा शेजारच्यांनी त्यांच्या बाल्कनी ला झाकायचे ठरवले आणि नेहेमीच निळ्याशार रंगांचे पत्रे बसवले. आम्हाला बोलायला विसरले नाहीत कि आमचा पर्याय कसा वाईट / चुकीचा आहे ते. बऱ्याचदा मला खूप काही लक्षात आलं खरं पण आज प्रकर्षाने जाणवलं म्हणून हा लेख प्रपंच. आज डोळे उघडल्या पासूनच पाऊस सुरु आहे, भुरभूरच आहे पण संततधार असा. बोलू नये पण तो निळाशार पत्रा अतिशयच आवाज करतो आहे, इतका काही पाऊस नाही पण त्या लोखंडी पत्रावर थेंब पडत असल्यामुळे जास्तच येतो आहे. हो तो निळाशार पात्र त्या बालकनीचं संरक्षण करत आहे, ओलं होऊ देत नाही आहे पण तरीही हे सगळं नको तितका आवाज करूनच करता येत का? तर नाही. पारदर्शक पत्रासारखं शांततेत देखल करता येतच. असं असावं माणसांनी देखील रोजच्या व्यवहारात, नाही का? शांततेत, सातत्याने, पारदर्शी असं काम करत राहावं.
रविवार, १६ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा