हा शब्द मी वारंवार माझ्या लहानपणी आईकडून ऐकला होता कारण मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून किती पसारा करायचो, विशेषतः शनिवार रविवार, उन्हाळ्या च्या सुट्ट्यां मध्ये. देवा, ती बोलून बोलून थकायची पण आम्ही पसारा करून दमायचो नाहीच. त्यानंतर आली माझी बारी, मी झाले आई. झालं का, तेव्हा समजलं मला कि सतत घरी पसारा असलं कि कसं वाटत ते. त्यात माझ्या कडे दुप्पट पसारा असायचा. कसा काय माझ्या पोट्ट्यंना वास यायचा कि कुणास ठाऊक मी टोपलीत सगळे खेळणे व्यवस्थित भरून, मांडून ठेवले रे ठेवले कि हि दोघे यायची आणि संपूर्ण टोपली मनसोक्त उलटीच टाकायची. देवा. मी बोलून बोलून थकायची पण ती दोघे पसारा करून दमायची नाहीच.
तर असा काय तो माझा संबंध आलेला "पसारा" ह्या शब्दाशी. अर्थात मी अनेकदा लिहितांना शब्दांचा पसारा मांडला आहे, पण त्यापुढे मला काहीही ठाऊक नव्हतं.
माझ्या मावशी एक दिवस अचानक म्हणाल्या मी उद्या सुट्टी वर आहे, कारण पसारा न्ह्यायचा आहे ना?
पसारा? ???
मला
नाहीच उमगलं. माझे प्रश्नार्थक भाव
बघून पोटतिडकीने त्याने मला
समजावून सांगितले कि त्या दुसऱ्या घरात राहायला जात आहेत,
सामान हलवायचे आहे = पसारा. देवा.
तर काल आमच्या घरासमोर एक कुटुंब राहत होत त्यांनी त्यांचा पसारा नेला, अर्धा दिवस चालू होती गडबड. छोटीशी झोपडी एक खोली आहे त्यात ३ मुलं आणि नवरा बायको राहत होते, पण कित्ती सामान ते, अवघडच आहे. अर्थात आपण माणसं खूप गोष्टी जमा करतो अनेक वर्षात आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आपआपल्या जागेवर असतात तोवर समजत नाही, पण बाहेर काढलं कि त्याचा आवाका समजतो. थोडक्यात कधी राहायला शिकणार कोणास ठाऊक, माझ्या पासून सुरवात आहे. तर आता मी निश्चय केला आहे जास्त सामान जमवायचं नाहीच. सुटसुटीत राहायला शिकायचं.
तरी
अशी
हि पसाऱ्याची कहाणी.
रविवार, १६ मे, २०२१
पसारा ....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा