माझ्या एक अत्यंत लाडक्या, आदर्श आणि अतिशय हुशार अश्या वाहिनी आहेत. काही वर्षा आधी जेव्हा मोबाइल फोनचा सुळसुळाट सुरु झाला होता, नवीन होत ते जग सगळ्यांनाच, Apps ची न्यारी दुनिया आणि बरंच काही, तेव्हा त्या वाहिनी सहज म्हणायच्या कि हा मोबाइल म्हणजे अवयवच झाला आहे. इतका वापर होतो त्याचा, देवा... असं काहीस. आता ह्या नवीन-सामान्य (new-normal) जगात जेव्हा सगळंच जग ह्या मोबाइल आणि संगणक तंत्रज्ञानावर चालतंय अश्या परिस्थितीत मोबाईल हा अवयवा पलीकडे गेला आहे. त्याला काही होता कामा नये. जिवापाड काळजी घेतली जाते आहे त्याची आजकाल.
मी एक पुस्तकात धडा लिहिला होता काही वर्षा पूर्वी आणि त्यात असं नमूद केलं होत कि अनेक देशां मधे २०२५ नंतर प्रत्येक जन्माला येणाऱ्या बाळाच्या हातावर एक छोटीशी मायक्रो चिप बसवली जाईल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, प्रकृतीची सगळी बारीक सारीक लक्षणे टिपण्या साठी वगैरे. एवढ्यातच मी एका भारतीय वैज्ञानिकांचे नवे संशोधन बघितले आणि त्याने शरीराच्या रंगाची न दिसणारी अतिसूक्ष्म पातळ अशी चिकटपट्टी तय्यार केली आहे जी मानेच्या मागच्या बाजूवर चिटकवली जाते आणि सगळे व्यवहार करता येतात / येतील. ती चिकटपट्टी इतकी नैसर्गिक रंगाची असणार आहे कि कुणालाही अजिबातच दिसणार नाहीच. म्हणजे काही काळातच पुढे मोबाइल किंवा संगणक हे तंत्र (बाह्य) अवयव न राहता अदृश्य स्वरूपात वापरावे लागणार आहेत हे निश्चित. अवयवाची नवीन परिभाषा...
रविवार, १६ मे, २०२१
अवयव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा