आज रविवार, मी अगदी ठरवलंच कि कचेरीचे काम थोडे बाजूला सारायचे आणि गप्पा मारायच्या, फोन करायचे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तमानपत्र मनापासून, वेळ देऊन वाचायचच. बस, मग काय न्याहारी झाली, भाजी घेऊन आले आणि लागेलच कामाला. "माझ्या" नागपूरला फोन केला, आणि काही नातेवाईकांशी बोलणं झालं आणि वर्तमानपत्र थोडक्यात वाचलं. मला आज स्व. बासुदांबद्दलचा लेख वाचायचाच होता. वाचायला सुरवात केली, लेखिकेने शब्दांची पेरणी अशी काही अफलातून केली होती कि... अप्रतिमच. वर्तमानपत्राच्या पुरवणीत तो लेख आला आहे, पहिल्याच पानावर. पहिल्या पानावरचे शब्द / वाक्य वाचता वाचता हे बघितलं कि मला तिसऱ्या पानावर जावं लागणार उरलेला लेख वाचायला, ठीक आहे म्हटलं आणि गेले सांगितल्या प्रमाणे. त्या पानावर उरलेलं साहित्य वाचतांना शेवटच्या ओळीवर लिहिलं होत कि आता दुसऱ्या पानावर जा. अरेच्या, हे काय अजिब. पहिल्यांदाच असं अनुभवलं खरं. इतकी वर्ष झाले मी नियमित मराठी वर्तमान पत्राची पुरवणी वाचते आहे, कधीही असं चुकूनही अनुभवलं नव्हतं. फबी / FB वर हा लेख प्रपंच करण्याचा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं आयुष्य हि असंच असतं नाही का? मागील पानावरून पुढे. कधी कधी पुढे जातांना मागील पानाचा आढावा घ्यावाच लागतो, मागे पुढे मागे पुढे चालूच राहत. अपरिहार्य आहे. शेवटी "जीवन चलनेका नाम..."
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा