रविवार, १६ मे, २०२१

योग

मी शेवटी माझ्या शेजाऱ्याला आज विचारलंच कुतूहल म्हणून, नाहीतर मी कधीच कोणच्या अध्यात मध्यात. तर त्याच असं झालं कि माझे शेजारी सकाळी "बिनतारी संदेशवहन" अक्का रेडिओ वर जुनी चित्रपटातली गाणी जोरजोरात लावतात, रोज हं, अगदी चुकता. मी राहवून खूप दिवसांनी आज चौकशी केली मोठयाने गाणी लावण्याबद्दल तर उत्तर काय मिळालं ठाऊक आहे का, मी योग करतो रोज सकाळी किमान तास. म्हटलं वाह वाह. फार छान. चांगला उपक्रम आहे आणि सद्य स्थितीत बहू उपयोगी सुद्धा. त्यांचा रेडिओ साधारणतः .३० वाजता सुरु होतो ते पर्यंत, रोज. काहीही संबंध आणि गरज नसतांना मी दोन प्रश्न विचारले, . काय काय करता योग? . कधी करता? सकाळी / संध्याकाळी / झोपताना? तर उत्तर मिळालं कि सकाळीच उठल्यावर ताबडतोब आणि मुख्य भर प्राणायमावर देतो.

हिंदी चित्रपट संगीत मोठ्याने ऐकता ऐकता योग साधना, क्या बात है?

वेगळ्याच अवलियाची ओळख झाली असं समजून मी पाय काढता घेतला आणि मी निःशब्द झाले अक्षरश:. त्यांना दररोज योग करण्याचा केवढा अभिमान आहे बाप रे. सतत स्वतःचा नगारा वाजवत असतात.

काय योगायोग आहे, मलाच असा शेजार मिळावा. असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...