आमच्या घराजवळ अगदी थोड्या पाउलांवर एक छोटेखानी श्री. दत्त मंदिर आहे. गोंडस, लोभस आणि कारागिराने मनापासून घडवलेली छोटी मूर्ती आहे स्थापित त्या मंदिरात. अगदी दररोज पहाटे पासून ते साधारणतः सकाळी ८ वाजेपर्यंत त्या मंदिरातून छान प्रसन्न असा घंटेचा नाद ऐकू यायचा ह्या ३ महिन्यापूर्वी पर्यंत, त्यानंतर अगदी बंदच झाला तो. मला तर खूपच चुकल्या सारखं वाटायचं. पण काय करणार, हाताबाहेरची परिस्थिती बदलू शकत नाहीच. असो. तर आज माझे डोळे उघडतच होते आणि काय चमत्कार, मला तोच घंटा नाद ऐकू आला पुन्हा. अहाहा काय सुरवात झाली दिवसाची म्हणून सांगू. मनापासून नकळत हात जोडले गेलेच, सगळं आता पूर्व पदावर येणार श्री. दत्ताच्या कृपेने ह्याची खात्री पटली, आणि आज कदाचित पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने मला नाद आणि आवाज ह्यातला फरक जाणवला.
रविवार, १६ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा