तर त्याच असं झालं कि साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यातली हि गोष्ट, माझी कन्या घरी होती, अभ्यासाची सुट्टी असल्यामुळे आणि तिची बरेच दिवसांपासून माझ्या मागे भूणभूण सुरु होती, रोजच्या वापरात असलेल्या आंबा लोणच्या मधे फोडणी घालण्यासाठी. मला जरा ते जमत नव्हतंच. त्या दिवशी मी तिला समजून सांगितलं, कचेरीत जाताजाता, घाईघाईत कि हे कित्ती सोप्पं आहे खरंतर, तू हि करू शकतेस वगैरे. तिने हि ऐकलं, आणि मी निघून गेले. दोन एक दिवसांनी मी जेव्हा आंबा लोणचं खायचं ठरवलं तर एकतर खालीच थोडं तेल सांडलेले दिसलं मला आणि मी कितीही प्रयन्त केला तरी ती लोणच्याची छोटेखानी बाटली काही उभी राहातच नव्हती. मी म्हटलं असेल काहीतरी. मी माझ्याच विश्वात रममाण, तेव्हा मी लक्ष नाही दिलं खास. पण थोड्यावेळाने लोणच्याच्या तेलाचे डाग बघून नीट बघितलं तर असं लक्षात आलं कि त्या छोट्या प्लास्टिक बरणी ची अवस्था झाली आहे, हेकडी वाकडी झाली आहे, किती तरी वेळ बघत बसले त्याकडे पण काही सुचलंच नाही, ह्या बाटलीची अशी अवस्था का झाली ते? खूप वेळाने लक्षात आलं कि अच्छा उरलेल्या, कोरड्या झालेल्या लोणच्यात आज फोडणी घातली गेली होती, अगदी गॅस वरून थेट प्लास्टिक छोट्या बाटलीत, देवा. ३ महिन्यांनी आज ह्या घटनेबद्दल लिहितांना देखील हसून हसून पुरेवाट झाली आहे माझी, अगदी डोळ्यात पाणी येईस्तोवर. एक चुकीची सूचना आणि त्याच हे फळ. आज सकाळी मी पुन्हा न्याहारी करतांना फोडणी बाजूला ठेवली लोणच्यात घालायला आणि सगळा प्रसंग इतंभूत डोळ्यासमोर जसाच्या तस्सा उभा ठाकला. माझ्या कन्येचा बिचारीचा काहीही दोष नव्हता, ती पहिल्यांदा करत होती हे सगळं, थंड झाल्यावर फोडणी घाल हे मीच सांगायची विसरले पण त्यामुळे हा लेख प्रपंच तर घडला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा