रविवार, १६ मे, २०२१

मास्टर चेफ...

अहाहा, आजची सकाळ फार उत्कृष्ट पद्धतीने सुरु झाली. मी मोठी टोपी घातली नाही डोक्यावर पण तरीही आज मला मास्टर चेफ असल्यासारखं वाटलं. सगळ्या भाज्या आणि तय्यारी करून दिली होती. मी फक्त ऐटीत फोडण्या घातल्या. सगळी म्हणजे सगळी जय्यत तयारी माझ्या पिल्लांनी सकाळी लवकर उठून केली. तय्यारी करतांना माझी लेक विचारते कशी, "का नाही आल्या मावशी आज? गावाला गेल्या म्हणून सुट्टी घेतली का?" मी म्हटलं "नाही, सध्या मावशींनी ठरवलं आहे कि महिन्यातून दोन दिवस स्वतः करता हक्काची सुट्टी काढायचीच, त्यामुळे त्या आज येणार नाहीत". तिला ते इतकं आवडलं कारण कि ती दुप्पट जोमाने कामाला लागली. मी मुलांना अजून एक कारण सांगितलं, नाण्याची दुसरी बाजू अशी कि त्यानिमित्यांने आम्हाला सकाळी लवकर उठून एकत्र दर्जेदार वेळ घालवता आला, अहाहा.

प्लॅन-बी मधे मी विचार केला होता कि सगळेच बाहेर खाऊयात, पण त्याची गरजच पडली नाही. मज्जा आली.

फारच गती कमी झाली आहे माझी हे नक्कीच, आणि ह्या सगळ्या कामानंतर माझे जे पाय दुखायला लागलेत, देवा, पण हरकत नाही, आता सवयही झाली आहे, आणि ते होतील बरे थोड्या वेळानी. सगळयांनी मिळून जी हसत खेळात मस्ती करत कामं केलीत त्यापुढे पाय दुखी जाणवणार पण नाही मला.

मास्टर चेफ होणं हि फारच भन्नाट गोष्ट आहे, जी मी आज पुरती अनुभवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...