रविवार, १६ मे, २०२१

नावाची सुयोग्य निवड

 माझी आज एका दिग्गज उद्योजका ची भेट झाली. आम्ही बोलता बोलता तिथे अजून एक सर आले आणि दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली. आश्चर्य म्हणजे दोघांचंही नाव एक सारखंच होत. त्यावर त्या उद्योजकाने त्यांचं नाव कस ठेवलं गेलं हा किस्सा सांगितला आणि दुसऱ्या सरांनाही विचारलं कि तुमचं नाव कस ठेवलं गेलं?

तो काळ म्हणे १९७०-७५ च्या दरम्यानचा. त्याच वेळी मेरिट लिस्ट छापण्याची प्रथा वर्तमानपत्राने प्रथमच सुरु केली होती. त्या वर्षी ज्या मुलाने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि त्याच नाव वर्तमानपत्रात झळकलं होत त्यामुळे उद्योजकाच्या आई वडिलांनी तेच नाव ठेवायचं ठरवलं. म्हणजे पुढे जाऊन हा मुलगाही असच जबरदस्त काम करेल वगैरे. वेगळी आणि छान वाटली गोष्ट. आपल्या देशात जिथे सगळेच जवळपास जन्मअक्षर, पत्रिका . भर देतात तिथे अशा पद्धतीने नाव ठेवलं ह्याच मला आश्चर्य हि वाटलं आणि वेगळेपण जाणवलं ते नक्कीच. आज ते प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि आय आय टी चे माजी विद्यार्थी देखील. म्हणजे त्यांच्या आई वडीलची नावाची निवड सुयोग्यच होती हे म्हणायला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...