रविवार, ३० मे, २०२१

जुनी गाणी

माझा जो वाहन चालक आहे त्याला अगदी बाबा आदम च्या जमान्यातले गाणे ऐकायला आवडतात. त्याच्या हातात गाडी असते त्यामुळे मीही काही म्हणत नाही, जाऊ दे, ऐकते गपचूप दोन्ही वेळेला कुठलेकी गाणे. पण परवा कहरच झाला. जाता येता दोन्ही वेळेला फार जुनी गाणी ऐकली, त्यानंतर मी व्यायाम करण्यास डॉक्टर च्या क्लिनिक मध्ये गेले. तर त्यांनी काय करावं, साधारणतः एक तास खंड पडू नये म्हणून कारवा रेडिओ सुरु केला. देवा. म्हणजे मला आवडतात मागच्या जमान्यातली गाणी ऐकायला, अर्थपूर्ण असतात ती, पण अती डोस झाला त्या दिवशी. बदल हवा नवं जुन्याचा. म्हणजे मला तरी विविध ठसक्यातली, चालीची, लयीची, पिढीची गाणी ऐकली कि फार उर्जित झाल्यासारखं वाटतं. हात अगदी सळसळतो आहे, असं वाटत कि घ्यावी गाडी हातात आणि आपल्या आवडीची विविध चॅनल वरची गाणी वाजवत वाजवत पोचावं कचेरीत / घरी. लवकरच जमेल असं वाटतंय मला.

wrote on 20th Aug 2019  on FB's timeline.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...