तीन
एक वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. माझा एक विद्यार्थी होता, त्याला आमच्या वसतिगृहात जागा मिळाली नाही राहायला म्हणून विद्यापीठाचं एक वसतिगृह होत थोड्याश्याच अंतरावर तेथे त्याची राहायची सोय झाली. त्याच्या वसतिगृहात एक दृष्टी थोडीशी कमी असलेला विद्यार्थी होता आणि त्याला वसतिगृह ते कॉलेज, मग जेवणाची खाणावळ आणि परत असं बरंच अंतर चालावं लागत होत रोज. माझा विद्यार्थी संगणक विश्वातील असल्यामुळे त्याने ठरवलं कि पांढरी काठी जी वाटसरू आहे तिला स्मार्ट करायचं आणि तो कामाला लागला, काठी हि त्याची उत्कृष्ट मार्गदर्शक सखी ठरली कारण ती त्याच्याशी संवाद साधत होती, तिच्यात संपूर्ण रस्त्याची माहिती आधीच साठवली होती आणि ती प्रत्येक वेळी मार्गावर नवीन आलेल्या गोष्टी ती काठी शिकत होती आणि त्या पद्धतीने मार्गक्रमणा फारच आनंदी झाली आणि सुरु राहिली. ह्यात दोन्ही विद्यार्थ्यांचं हित झालं, एकाला पांढरीच पण हुशार साथी मिळाली आणि माझ्या विद्यार्थ्यांचं प्रोजेक्ट फार वेगळ आणि समाधान देउन गेल. तर अशी हि पांढरी काठी फक्त वापरणाऱ्या मित्रांनाच वरदान ठरते असे नाही पण रस्त्यावर चालणाऱ्या डोळस व्यक्तींना, टेकनॉलॉजि क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनाच अभूतपूर्व आहे. अजून संशोधन आवश्यक आहे ह्या काठी संबंधित आणि काही शक्य पर्याय मी इथे मांडत आहे, ते असे, तिच्या मुठीत सॅनिटायझर ठेऊ शकतो, वातावरण बदल झाला तर ती काठी टोपी, किंवा रेन कोट घालण्याचा सल्ला देऊ शकते, रस्त्यावरच्या दुकानांची नाव वाचू शकते, प्रश्न विचारला तर उत्तर देऊ शकते, एखाद्याने रिक्षा वापरायची ठरवली तर ती नीट मार्गाने जाते आहे किंवा नाही हे ही सांगेल, रिक्षाचा नंबर वाचेल आणि लक्षात ठेवेल तात्पुरता. अशी आधुनिक जिच्यात अनेक सेन्सर्स / संवेदक वापरावे लागतील, अशी काठी सोलर वापरून चार्जे करता येईल, हि तंत्रज्ञानाने युक्त काठी घरी विविध वस्तूंवर नमूद केलेली कालबाह्य तारीख (expiry date) सांगू शकेल, आणि बाहेर चालतांना काही फूट अंतरावरची सगळी माहिती पट्टाकिनी सांगू शकेल, आणि हि यादी खरंच फार मोठी आहे.
पांढऱ्या रंगाच्या पाठीमागे देखील अनेक कारणे आहेत, अंधारात देखील सगळ्यांना दिसतो असा
रंग, जगभरात एकच
रंग
नियमित वापरण्यात येतो ह्या काठी करता, कलर
ब्लाइंडनेस असल्येल्या व्यक्तींना देखील हा रंग दिसतो पटकीनी, स्वछ निखळ मैत्रीचा हा रंग आहे (ज्यांना थोडं कमी दिसत त्यांनी आणि बाकीच्यांनी देखील मैत्री केली आहे ह्या पांढऱ्या सखीशी) आणि असे अनेक कारण आहेतच हि काठी पवारण्या मागे.
ब्रेल लिपी वापरून काही कंपन्यांनी मनगटी घड्याळ तय्यार केली आहेत. हि स्मार्ट घड्याळ स्मार्ट फोनशी देखील संवाद साधू शकतात, फोन वर आलेले निरोप, किती वाजलेत, बातम्या, ई-मेल आणि बरच काही वाचून दाखवतात कारण हि घड्याळ आणि स्मार्ट फोन एकमेकांशी संवाद साधतात.. अश्याच प्रकारे फोन आणि काठी मधे देखील संवाद साधता येऊ शकतो. अर्थात संशोधन करावं लागेल ह्या करता.
आपल्या पुढे चालते हि पांढरी काठी मग सर्वार्थानेच / तांत्रिक दृष्टीने तिला तांत्रिक बळ दिल तर ती अजून जोमाने सगळ्यांसाठी काम करेल.
आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काठी हि काठी"ती" आहे, स्त्रीलिंगी आहे, बहीण आई सारखी काळजी घेणारी, त्यांची जे वापरात आहेत आणि त्यांची सुद्धा ज्यांनी हि काठी बघून रस्त्यावर / घराबाहेर वावरावं अश्या सगळ्यांचीच, नाही का? तर अशी हि माझी मत आहेत ह्या बहुआयामी आणि बहुउपयोगी वाटसरू बद्दल ची.
मंगळवार, ४ मे, २०२१
वाटसरू...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा