जेव्हा दोन
सजीव एकमेकांसमोर येतात तेव्हा "राम
राम", "नमस्कार", "काय
म्हणताय?", "सुप्रभात" ई. पद्धतीने अभिवादन केलं जात, जावं किंवा जात
असेल. दुरूनच दिसत हे बघणाऱ्याला त्यामुळे त्या दोघातला संवाद काय होतो कोणास ठाऊक. काही सेकंद दोन्ही सजीव थबकतात, बोलतात (शब्दांनी आणि डोळ्यांनी देखील) आणि पुढे जातात त्यांच्या त्यांच्या मार्गाला, ध्येय गाठायला. क्रिकेट च्या सामन्यांमधे सुद्धा आपण बघतोच हे, थोडक्यात सूचना किंवा पुढची चाल ई. ठरवतात बहुतेक दोन फलंदाज. कचेरीत मीटिंग ला जातांना, समारंभात पटकीनी एखादी सूचना देतांना, आणि अश्या अनेक प्रसंगी मी हे सूक्ष्म संवाद बघितले आहेत.
परवा मी नेहेमीच्या सवयीप्रमाणे देवघर साफ केलं, देवांना हार घातले (हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा घालते) आणि काल संध्याकाळी शुभंकरोती म्हणतेवेळी बघते तर काय मुंग्यांची रांग दिसली मला, नैवेद्याला होत्या का अजून काही हे बघायचं दिल सोडून, मी त्यांची ये-जा च निरीक्षण करत राहिले, न कळत, बराच वेळ. आणि त्यात मला असं आढळून आलं कि प्रत्येक वेळी दोन मुंग्या एक मेकांसमोर आल्या रे आल्या कि थबकत असत काही क्षण आणि मग पुढे जात असत. कुतूहल फारच वाटलं मला, कि ह्या काय संवाद साधत असतील, इतक्या सारख्या दिसतात मला सगळ्याच मुंग्या तेव्हा संवाद साधल्यावर तीच मुंगी पुढे जात असेल का मागे... आणि बरच काही. त्यांची भाषा असेल का कि फक्त स्पंदनातून देवाण घेवाण होत असेल? असे अनेक प्रश्न मनात उद्भवले म्हणून लिहावंसं वाटलं. आणि माझ्या संगणक विश्वात "मुंग्या समूह सर्वोत्तमीकरण / ant
colony optimization" हा फारच सुप्रसिद्ध गणनविधि / अल्गोरिथम / algorithm
तय्यार केला आहे
आणि
असंख्य संशोधक वापरात आहे. ह्या मुंग्यांच्या, त्यांच्या राणीच्या, हालचालीच्या आणि
एकंदरीत राहणी / कुटुंब ई. चा सखोल अभ्यास करून, माणसाच्या जीवनातील घटनांशी, सिस्टिम शी मॅप करून तय्यार केला आहे हा सुप्रसिद्ध गणनविधि / अल्गोरिथम / algorithm. विचार करावा, मॅप करावं आणि लिहावं तेवढं थोडंच आहे, इवलेसे जीव पण काय प्रचंड सखोल ज्ञान दडलंय त्यांच्यात, अहाहा.
मंगळवार, ४ मे, २०२१
राम राम ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा