ती पहाटेची रम्य वेळ होती, साधरणतः ५.३० वाजले असतील. मला नेहेमी प्रमाणे जाग आली ती माझ्या गजरामुळे नाही तर त्या शांत वेळी अतिशय मोठ्या आवाजात मला "दिल तो पागल है दिल दिवाना है..." हे गाणं ऐकू आलं. मला वाटलं भास झाला असेल, पण मग थोड्यावेळाने माझी थोडीशी काम करतांना मी काही भांडी घेण्याकरता बाल्कनीत गेले आणि हबकलेच. आमच्या घरा मागे एक बांधकाम सुरु आहे, गेली अनेक महिने, अर्थात मधल्या काळात थोडं थंडावलं होत काम, पण आता जोर धरलाय. तर त्या साईट वर जी कामगार मंडळी राहतात ते शेकोटी पेटवून बसली होती आणि चक्क चित्रपट बघत होती हा, मोठ्याने. आपल्याला सकाळी हे बघण्याची सवय नसल्यामुळे मला थोडं आश्चर्य वाटलं पण मग नंतर विचार केल्यावर लक्षात आलं कि त्यांच्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या पत्र्याच्या खोलीत थंडी वाजत असणार, त्यामुळे लवकर जाग येत असणार, मग शेकोटी समोर बसून अशी करमणूक केली त्यांनी, दिवसभर मग काम आहेच,नाही का. मी हि मग तो चित्रपट ऐकता ऐकता नाश्ता, माझा डब्बा वगैरे आटोपला, आगळ्यावेगळ्या वातावरणात, संगीत आणि संवादाच्या पार्शवभूमी बरोबर. वाह वाह. मज्जा आली. तर अशी ती माझी रम्य सकाळ ची काल सुरवात झाली, काम कधी आटोपली कळली देखील नाहीत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा