मंगळवार, ४ मे, २०२१

टॅक्सी ...

मागल्या वर्षी बरेच महिने मी दररोज टॅक्सी ने कचेरीत ये-जा करत असे. आमचं कॉलेज तसं बऱ्यापैकी लांब आहे शहरापेक्षा आणि तेव्हा टॅक्सी वाल्यांना असं वाटायचं कि जर त्यांनी मला सोडलं कचेरीत तर परत येतांना त्यांना सवारी मिळणार नाही. त्यामुळे माझं हे फारच मोठं काम असायचं दररोज सकाळी टॅक्सी शोधणे, मिळाली रे मिळाली कि त्या वाहन चालकाचा मला फोन यायचाच, "कुठे जायचं आहे?". माझ्या कचेरीच नाव घेतलं रे घेतलं कि बुकिंग रद्द करायचेच. मग शेवटी एखादा सापडत असे.

असो, गेले तेही दिवस. इतक्यात आम्हाला दररोज हजर राहायला सांगितले आहे कचेरीत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा देवाचे नाव घेऊन टॅक्सी ने ये-जा सुरु केली, बस पुढील महिन्यात लावणार आहे, पण आता त्याच टॅक्सीवाल्या मधे जमीन-आसमान चा फरक आहे. आता कुठलाही फोन येत नाही, चुपचक सोडायला येतात.

ह्याची अनेक कारण आहेत, एक म्हणजे सद्यस्थिती, त्यांना गिऱ्हाईक हवं आहे, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या इथे भलं मोठं रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालं आहे.

अर्थात टॅक्सी चे पैसे हि फारच वाढीव दराने घेतात त्याच अंतरासाठी, पण इलाज नाही. सुगिचेच दिवस आले म्हणायला हरकत नाही. टॅक्सी ने कचेरीत येणं इतकं पण सोप्प आहे हे माझ्या साठी फार प्रेरणा देऊन जाणार आहे. मस्त दिवस सुरु झाला आज. अहाहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...