मंगळवार, ४ मे, २०२१

दैदिप्य सर्वोच्च नैवेद्य अविज्ञान अतिशय कणव नियती पार्थिव वरदान ....

अबब, काय हि वेगळी नाव, हो हि मुलांची नाव आहेत जी मी पहिल्यांदा ऐकली एवढ्यातच आणि काही नाव ऐकून वाचून फारच आश्चर्यचकित झाले. अशीही नाव मुलांची असतात ह्यावर विश्वास ठेवलायला थोडा वेळ लागला मला.

अतिशय हा शब्द म्हणून मी आजवर ऐकला, वाचला आणि वापरला आहे तो "अतिशय साधारण राहणीमान आहे","अतिशय सुंदर कल्पना, चित्र, कविता.." साठी, पण हे एका मुलाचं नाव, हे जरा वेगळं वाटलं मला. हा फार मोठा फायदा झाला मला आमच्या कडे ऍडमिशन घेणाऱ्या मुलांचं समुपदेशन करतांना. वैविध्य नाव ऐकायला मिळाली. आणि हो ह्या शिवाय इंग्लिश मधली नावांची यादी देखील आहे माझी तय्यार, मुलं भारतीय पण नाव इंग्रजी ड्रीझल, जॉय, मिचेला, अक़सा, बिलक़िस ... असो.

वरदान देतो, नैवद्य दाखवतो, सर्वोच्च बिंदू गाठतो, दैदिप्यमान यश / किर्ती / कामगिरी करून दाखवतो... फक्त क्रियापदे असतात ह्याची मला जाण होती शब्दांची. किती तुटपुंज माहिती आहे मला ह्या माझ्या भाषेबद्दल. अजून अभ्यास हवा.

कणव, नियती, पार्थिव आणि अविज्ञान अश्या शब्दांबद्दल मला नकारात्मक अर्थ माहित होते फक्त, पण भाषा हि बहुअंगी असते आणि ती अनेकविध प्रकारे वापरतात ह्या बद्दल मी पूर्णपणे अनभिन्य होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...