मंगळवार, ४ मे, २०२१

"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले"...

मी आज पर्यंत अनेक उच्च विद्या विभूषित आणि सगळं जग फिरून आलेले असंख्य लोक बघितले आहेत आणि निरीक्षण पण केले आहे. त्यात दोन भाग आढळले मला, एक फार मोठा भाग / वर्ग आहे ज्यात सतत ते दुसऱ्यांना सूचना देत असतात, अजिबात थकत नाहीत सूचना देऊन, आणि दुसऱ्या भागात अगदी बोटावर मोजणारे लोक आहेत जे शांत असतात, विचारलं तरच सल्ला देतात अजिबात नाक खुपसणार नाहीत कोणात. असो. ह्या सद्यस्थितीत आणि त्या आधी पण खोकताना आणि शिकतांना तोंडावर आपला हात किंवा रुमाल ठेवावा हे सगळ्यांना माहित होत, आवश्यक आहे आणि हि एक शिस्त आहे. ह्या नवीन दिवसात (न्यू नॉर्मल) मी अनेक अतिहुशार लोकांना दुसऱ्यांनी मास्क नेहेमी घालावा जर खोकला असेल तर वगैरे सूचना देतांना बघितलं आहे ऐकलं आहे, किंबहुना ते थोडे वाईटच बोलतं असतं जर मास्क घालता कोणी चुकून खोकला तर, पण जेव्हा स्वतःला खोकला होतो तेव्हा तेच सगळे आपलंच राज्य असल्यासारखे वागतात, मास्क तर नाहीच पण तोंड उघडून व्यवस्थित खोकणे.... ह्याला काय म्हणावं? मूर्ख? नाही नाही हा तर फार छोटा शब्द झाला. अनेक दशक आधी श्री. रामदास स्वामी नी हे ओळखलं आणि चपराक असे छोटेखानी वाक्य आपल्या सगळ्यांना देऊन गेलेत. काय मर्म आहे नाही ह्या वाक्यात. आणि तसं अवघड आहेच बोलणं आणि चालण्यात ताळमेळ राखण, सध्या माणसाचं काम नाही ते, थोडी साधना आवश्यक आहेच त्याकरता...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...