माझ्या आईकडे असतांना लग्नाआधी पहाट म्हणजे काय? ती कधी होते? हे फक्त वर्षातून एकदाच समजत असे तेही नरक चतुर्दशी दिवशी. बास. त्यानंतर आणि आधी माहितच नाही लवकर उठणं, कदाचित रात्री जरा जास्त अभ्यास करत असे म्हणून किंवा झोप अतिशय प्रिय म्हणून किंवा तिथे सगळंच इतकं आरामदायी होत हि ज्याचं नाव ते. मला नक्की आठवत नाही पण बहुतेक इसवीसन .... नाही, २००० साली पहाटे पावणे सहा ला माझा स्वयंपाक सुरु होत असे, ७ मोठ्या माणसांचा स्वयंपाक, अर्थात फक्त एखाद वर्षच मी केला, मग मुलं झाल्यावर तर मी तारीख वार वेळ सगळंच विसरले होते १ पूर्ण वर्षभर, मी कधी झोपत असे, उठत असे काहीही दिनचर्या नव्हतीच. मग त्यानंतर जेव्हा त्यांची शाळा सुरु झाली त्यावेळी सगळ्यांचा डब्बा करण्यासाठी उठाव लागायचं लवकर, मुलं जागी होण्या आधी आणि आता अंगवळणी पडलंय, गजर लावल्याशिवाय जाग आपोआप येतेच. अर्थात गेल्या काही वर्षांपासून माझी थोडी गतीही कमी झाली आहे त्यामुळे लवकर उठलं तरच वेळेत सगळं होत. आज हा विषय का म्हणताय? अहो मंडळी आज कधी नव्हे ते माझी लेकरं पण पहाटे उठली परीक्षा आहे म्हणून, तेव्हा दोघांनीही एका सूर-तालात विचारलेला हा प्रश्न, म्हणून म्हटलं, चला, करा सुरवात आणि लिहा. मग काय व्हरच्युअल कागद पेन उचलला आणि जसे शब्द सुचले तसे मांडले एवढंच.
मंगळवार, ४ मे, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा