मला
आठवतंय माझ्या दोन्ही बाळांना लहान असतांना मी मिटन्स घालायचे दररोज दोघांसाठी दोन विविध रंगांचे अनेक सेट आणले होते. मिटन्स घालत नव्हते तेव्हा फारच स्वतःला नख लावून घ्यायचे दोघेही म्हणून आवर्जून आणले पण काही उपयोग झाला नाही. कसे कुणास ठाऊक पण मिटन्स घातल्या घातल्या काही क्षणात काढून टाकायचे. धन्य आहे नाही.
हे आज मला का आठवलं म्हणताय, कारण आहे त्याला खास.
आता
सध्या नवीन जन्म घेतलेल्या बाळांना लावत असतील का मास्क? म्हणजे ३-४ महिने किंवा त्या पेक्षा मोठे बाळांना. आणि लावत असतील तर ते ठेवत असतील का मिटन्स सारखं ताबडतोब काढून टाकत असतील? नवीन आई ला विचारलं पाहिजे ह्या बद्दल.
माझ्या काही मुलांच्या अगदी लहानपणीच्या फोटो मध्ये एका
हातात एक आणि दुसऱ्या हातात भलत्याच रंगाचे मिटन्स आढळतात. किती वेगळी शैली / फ्याशन त्या वेळ पासून अमलात आणली बघा माझ्या मुलांनी.
मंगळवार, ४ मे, २०२१
मास्क आणि मिटन्स
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा