मंगळवार, ४ मे, २०२१

ओव्हन

माझ्या कडे सगळ्यांनाच केक करण्याची आवड आहेच आणि त्यामुळे एक ओव्हन पण आहे घरी पण तो सध्या मुलांच्या हिशोबा ने म्हातारा झाला आहे. आता नवीन घ्यायचाच आहे, लवकरात लवकर.

तर आज मी आणि माझा लेक ह्या विषयावर चर्चा करत होतो तेव्हा पठ्ठा काय म्हणतो, मम्मा केक ची जी कृती दिलेली असते ती आणि आपल्या घराचा ओव्हन, केकचे साहित्य, मोजमाप, तापमान आणि बरेच काही आपण हळू हळू शिकतो आणि सरते शेवटी केक चांगला होतो. आता आपण नवीन ओव्हन घेणार मग त्याची सवय व्हायला, किंवा त्याला समजावून घ्यायला अजून मला वेळ लागेल, कि कृतीत म्हणतात १८० डिग्री ठेवा अमुक मिनिटे . पण नवीन ओव्हन वर प्रत्यक्षात किती डिग्री लागेल हे बघायला लागेल.

तेव्हा माझ्या मनात आलेले विचार इथे मांडते आहे.

आपल्या सगळ्याच अवस्था / टप्प्यात असंच असतं नाही, कुठलंही नवीन नातं कळायला अनेक दिवस / महिने / वर्ष लागतात, मग ते माणसातलं असो, गाडी बंगल्याशी असो, शेजारी-पाजाऱ्याशी असो, किंवा कचेरीत, नाही का. केक सारखं नातं फुलायला, स्पॉंजी होण्याकरता सगळ्या साग्रसंगीत कृतीची चपराख प्रमाण / संख्या जमलं /मिसळलं पाहिजेच. नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...