मंगळवार, १८ मे, २०२१

काल मी पोट धरून हसले....


तर त्याच असं झालं, माझ्या कडे श्री. दत्तजयंती निमित्य "श्री. सत्य दत्त" पूजा होती. त्या करता मी सगळी जय्यत तय्यारी केली होती, फक्त एक गोष्ट राहून गेली, ती मला फारच उशीरा लक्षात आली. म्हणून माझ्या मावशींना सांगितले आणि त्याही नक्की आणून देते म्हणाल्या. सकाळी हात हालवत आल्या मावशी. "पूर्ण विसरले हो..." म्हणाल्या. मग मावशींनी त्यांच्या अहोंना फोन केला, नीट समजावून सांगितलं माझ्या समोरच, कि "ताईकडे पूजा आहे म्हणून आंब्याची पान तोडून आणून द्या किंवा मुलाच्या हाताने पाठवा". थोड्याच वेळात मावशीचा मुलगा धावत पळत आला, छोटीशी पिशवी हातात घेऊन, त्यांचे अहो पण उभे होते जवळच आणि मी धन्यवाद म्हणून पिशवी हातात घेतली आणि निःशब्द झाले. हसूच आलं मला. संध्याकाळी मावशी आल्यावर त्यांनाच दाखवली ती पिशवी, त्यानाही हसू आवरलं नाही. वेळ दवडता फोन केला मावशींनी अहोंना "अहो काय पाठवलंत हे..." "पूजेला कोणती पान लागतात..." तर ते म्हणतात कसे "मला वाटलं अजून ताईचे पाय दुखत असतील म्हणून मी काळजी पोटी कडुनिंब पाठवला...". म्हणजे किती काळजी आहे बघा त्यांनाही माझी. ताई (मी) म्हणजे "पाय दुखी वरचे उपाय..." हे समीकरणच झालंय सध्या. असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...