मंगळवार, १८ मे, २०२१

(साधं) पिठलं ...


आज माझी सुट्टी होती. त्यामुळे दुपारी ठरवलं आणि केलं सुद्धा, झणझणीत वऱ्हाडी पिठलं. आणि मग काय विचारता, पर्वणीच जणू, गरम गरम पिठलं भातावर ताव मारला. आज आणि नेहेमीच पिठलं करताना मला एक प्रसंग आठवतो. त्याच असं झालं कि मी साधरणतः नववी दहावीत असेन त्यावेळी आम्ही गाडी करून कुठे तरी फिरायला गेलो होतो. परत येतांना नरसोबाची वाडी जवळच होती, आणि रात्रही फार झाली होती. आमच्या गुरूंजीकडे एक रात्र राहायचं असं सर्वानुमते ठरलं. आणि आम्ही गाडी वळवली, पोचलो वाडी ला. त्यावेळी साधे काळे फोन देखील नव्हते सर्रास वापरात. त्यामुळे आम्ही सगळे थेट धडकलोच गुरुजींकडे. गुरुजींच्या बायकोने पाणी वगैरे देऊन आम्हला सांगितलं कि पिठलं-भात करते पट्टकिनी आणि त्या कामाला लागल्या देखील. अगदी थोड्या वेळात साधं पिठलं तय्यार झालं देखील, त्यात खरंच काहीही नव्हतं म्हजे कांदा, मिरची, कढीपत्ता, . पण त्याची जी चव होती त्या साठी माझ्याकडे शब्द नाहीत वर्णन करायला. त्यानंतर आज पर्यंत मी अनेकदा पिठलं केलय स्वतः पण ती चव ह्या जगावेगळीच होती. त्या काकूंचा इतक्या वर्षाचा अनुभव असेल, किंवा त्या ठिकाणाचं महत्व, मला नाही माहित, पण इतकी वर्ष झाली तरी विस्मरण होत नाही त्याच. अफलातून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...