माझे मामाचं घर नागपूर विमानतळाजवळ होत. मी फारच छोटी होते जेव्हा त्यांनी त्यांचं घर बांधलं. दर गुरवार, रविराव त्यांच्याकडे जाण व्ह्याच, दत्तसंप्रदाय आणि भजन असायचं त्यामुळे. तेव्हा संध्याकाळी माझा आवडता छंद म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकाशाचा झोत बघत बसायचं, कारण तो संदेश असायचा येणाऱ्या विमानाला त्याकाळी. कदाचित आज सारखी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial
Intelligence) त्यावेळी नव्हती. आणि
मग काही वेळातच मोठयाने आवाज करत विमान यायचं आणि ते दिव्यांचे झोत बंद व्ह्याचे. रात्रीच्या वेळी ते दृश्य इतकं अप्रतिम असायचं कि आता मला ते शब्दात मांडण फारच अवघड आहे. हे आज लिहिण्याचं कारण म्हणजे मी आज तसाच प्रकाशाचा झोत बघितला, कदाचित आमच्या हाय स्ट्रीट वर काही कारणासाठी बसवला असेल. पण त्यामुळेच मला पुन्हा एकदा माझ्या छोटेपणी जाऊन येत आलं, फेरफटका मारून येता आलं. त्या आज दिसलेल्या प्रकाश झोताला मनापासून धन्यवाद.
मंगळवार, १८ मे, २०२१
विमान येण्याचं औत्सुक्य...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा