मंगळवार, १८ मे, २०२१

निरागस प्रश्न...


आज ह्यांचा एक मित्र, त्याची बायको आणि मुलगी आमच्याशी गप्पा मारायला आले होते घरी. त्यांची मुलगी पाहिलीत होती. गप्पा झाल्यावर जेव्हा ते जायला लागले तेव्हा एक रस्त्यावरचा कुत्रा (Street-dog) समोर आला आणि मित्राची बायको फार घाबरली. तिच्या जवळच्या मित्राला चावलेला कुत्रा आणि एकंदरीत तो वाईट प्रसंग कथन केला. तेव्हा ती बरेचदा म्हणाली कि मला रस्त्यावरच्या कुत्रांची (Street-dog) फारच भीती वाटते. तर त्यावर त्यांची मुलगी कशी म्हणते कि आई रस्ता / street म्हणजे काय? आणि त्यांना रस्त्यावरचे कुत्रे का म्हणतात? ओह, इतकं आवडला मला म्हणून सांगते.... अहाहा.... किती निरागस प्रश्न तो.

त्यावरून आठवलं, मी आणि पोरं एकदा एक मराठी चित्रपट बघत होतो. त्यात मुलगी सासरी जाण्याचा प्रसंग होता. त्यावर माझी लेक (फारच लहान होती) म्हणते कशी मम्मा प्रत्येक वेळी फक्त गर्लनीच का जायचं? म्हणजे तिला पडलेला प्रश्न म्हणजे का मुलगीच सासरी जाते?. हा प्रसंग मी आज त्या मित्राच्या बायकोला सांगितलं तर ती हि म्हणाली कि तिचीही लेक विचारते म्हणे सासर म्हणजे काय? देवा. किती जिज्ञासू... अहाहा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...