शुक्रवार, २१ मे, २०२१

कोंड्याचा मांडा करणे ...


आम्हाला हि म्हणं होती शाळेत. तेव्हा काय समजलं होत ते आता आठवत नाही पण आज हि म्हणं पुन्हा नव्याने कळली, किंबहुना तिची शब्दश: प्रचिती आली म्हणून म्हटलं लिहावं. तर त्याच असं झालं कि सध्या मला माझ्या वैद्यांनी (डॉक्टर हो) कोंडा सगळ्यात घालून खायला सांगितलं आहे, पोळीत, दलियात, पराठ्यात, सूप मध्ये वगैरे... माझे चिरंजीव विचारात होते आज, हे का खायचं?, आणि काय मिळत हे खाऊन?, थोडक्यात, मलाच का? आणि किती दिवस?.... तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं कि कोंडा म्हणजे काय, त्याचे गुणधर्म, उपयोग . त्याशिवाय मी लहान असतांना आमच्या घरी दररोज कणिक चाळून घ्यायचे, तो चाळून निघालेला कोंडा मग एक डब्ब्यात सांभाळून ठेवायचा. तो कोंडा घालून मग थालीपीठ, कि मसाला भाकरी पदार्थ केले जायचे आणि ते फार चविष्ट लागायचे आणि कोंड्याचा उपयोग हि व्हायचा. कधी कधी गायीला पण खायला देत असू आम्ही तो कोंडा.

हे सगळं भलं मोठं स्पष्टीकरण दिल्यावर मी हि म्हणं सांगितली त्यांना ...

फारच मज्जा आली मला, पुन्हा एकदा लहानपणच्या घरी जाऊन आले, आठवणी जाग्या झाल्या. खूप प्रसन्न वाटतंय. वेगळीच सुरवात झाली दिवसाची आज.

अर्थात फार फरक आहे, सध्याच्या काळात हि म्हणं लागू पडत नाही. त्याची कारणे अनेक आहेत. कणिक चाळून घ्यावी लागत नाही, त्यामुळे कोंडा घरी साठत नाही, विकत आणावा लागतो, गायी दारात येत नाहीत.... आणि अनेक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...