शुक्रवार, २१ मे, २०२१

वाफाळलेली परतफेड (भाग २०)

अजूनही माझे पाय ताळ्यावर आले नाहीत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. गेल्या १६ सप्टेंबर रोजी मी एक वर्ष पूर्ण केलं माझ्या पायांच्या दुखण्याचं. कासवाची गती आणि सुजलेले पाय बघून सहजच मला बरेच जण प्रेमापोटी बरेच उपाय सुचवतात, जे त्यांच्या कामी आले आहेत. त्याच पैकी एक उपाय म्हणजे "निर्गुडीच्या पाल्याचा" वापर. मला हि ऐकून माहित होतच पण लक्षात आलं नाही. जेव्हा मी ऐकलं कि "निर्गुडीच्या पाल्याचा" माझ्या एका सहकार्याला फारच उपयोग झाला, किंबहुना रामबाण उपाय ठरला, तेव्हा म्हटलं बघावं हे हि करून. पण हुकमी हा पाला आणायचा कुठून. माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी पासून विचारायला सुरवात केली. आजकालच्या आधुनिक वसाहतीत जरा अवघडच झालं पाला मिळणं. पण तरीही मी त्याचा पिच्छा सोडला नाही. आणि सरते शेवटी आमच्या समन्वयक (कोऑर्डिनेटर ) ना विचारलं आणि ताबडतोब पाला मिळाला. तो पाण्यात उकळून पाय घालून बसण्याचा सिलसिला / दिनक्रम रोज चालू झाला. आणि फारच फरक जाणवला, सूजही थोडी कमी झाली आणि बरं वाटायला लागलं मला. तेव्हा मनापासून असं वाटलं कि ज्या ने हा पाला लावला असेल, आमच्या मोरे सरांनी तोडून आणला, प्राची मॅडम ने पाठपुरावा करून माझ्या पर्यंत पोचवला, माझ्या लेकींनी उकळून दिला, ज्या पाण्यात उकळलं, जे भांड, बादली  वापरली, ती औषधी वाफ . ह्या सगळ्यां ची परतफेड कधी आणि कशी करू. अगणित असे आहेत ते.

एकदा तर असं झालं कि मी एका विद्यावाचस्पती च्या सादरीकरणात होते. चहा च्या निमित्याने एक शिपाई आत आला आणि अगदी हळूच म्हणाला कि "मॅडम तुमची भाजी आली आहे, जाताना नक्की घेऊन जा". फक्त गडाबडा लोळले नाही मी जमिनीवर हे ऐकून कारण ती भाजी नव्हती "निर्गुडी
चा पाला" होता. अप्रतिमच अनुभव. वाह वाह.

Narrated this on Oct 20th 2019 as a chain of write-ups giving thanks to many who helped me stand on feet again. Today's legs position is much much better due to all these important players in my life who helped in my crucial time. Wow, what a support system indeed. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...