आमच्या नागपूरची थंडी म्हणजे काय विचारता, अगदी गारठवणारी. अर्थात सगळेच ऋतू टोकाचेच आहेत / होते नागपुरात. त्यावेळी केश तेलाची फार वैविधता नव्हती उपलब्ध बाजारात आज सारखी. फक्त खोबरेल तेल ते काय असायचं, Parachute कंपनीचं. एका छोट्या निळ्या लहान प्लास्टिकच्या डब्यात किंवा उभ्या बाटली तत्सम पॅकिंग मध्ये मिळायचं. आणि नेमकं ते थंडीत थिजायच. मग आमची रोजची कसरत सुरु व्हायची, गरम पाण्यात ठेव, गॅस वर धर आणि बरच काही. त्यामुळे काय व्हायचं ना कि त्या बिचाऱ्या छोट्याश्या प्लास्टिक डब्याचा आकारच बदलून जायचा, विचित्र पद्धतीने. पण ती मज्जा काही औरच होती. आता तंत्र ज्ञानामुळे खोबरेल तेल सुगंधी झालय आणि थिजत पण नाही. फक्त आठवणीच राहिल्या आहेत. पण आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे परवा मी महिन्याचं सामान बिग बास्केट वरून मागवत होते तेव्हा मला तीच निळी Parachute ची डब्बी दिसली ऑनलाईन संगणकावर. अहाहा मस्तच वाटलं. काय दिवस होते ते, भन्नाटच.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा