माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने विचारलं कि मागील वर्षी काय शिकवून गेलं आणि नवीन वर्षी काय काय करायचा विचार आहे, त्या शिकवणीवर आधारित? फार उत्तम, आणि विचार करायला लावणारा प्रश्न होता. म्हटलं विचार करून लिहावं थोडसं ह्यावर.
व्यायामाचं महत्व पटलंय मला, त्यामुळे दररोज चालणार नवीन वर्षात हे प्रथमतः ठरवलं आहे. तब्बेत महत्वाची असतेच. प्रकृती ठीक तर कुठलही काम अवघड वाटत नाही. त्यामुळे थोडस जपायचं ठरवलं आहे स्वतःला.
माझे बाबा नेहेमी लिखाणाचं महत्व सांगायचे. म्हणायचे लिहिता लिहिता नवीन विचार सुचतात, प्रसन्न वाटत आणि
पुढचं लिखाण सहज
होत. त्यामुळे विचारपूर्वक आणि
वेगळा वेळ
काढून लिखाण कडे
थोडं जास्त लक्ष देणार मी, असं
ठरवलं आहे.
माणसं, परिस्थिती, वागणुक आणि
घटना ह्या सर्वांचा मुक्त हस्ते स्वीकार करणार मी, आणि
पुढे जाणार. नको
ते विचार / अनावश्यक गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार, मस्त खाणार आणि भरपूर सगळ्यांसोबत हसणार. बास, एवढंच करायचं ठरवलं आहे. आवाक्यात आहे. प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न नक्की करणार.
(Written on FB on Dec-31st 2019), so true even today. Hence felt like sharing again.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा