मंगळवार, १८ मे, २०२१

नारळाची वडी...

 आमच्या कडे होणारा नेहिमीचा आणि आवडीचा पदार्थ. माझी आई निष्णात होती पटकीनी वड्या करण्यात. शाळेत जात असल्यापासून मला आठवतंय कि आई बहुतेक सणाला किंवा सुट्टीच्या दिवशीच नारळाच्या वड्यांचा घाट घालायची. मला फारच उत्सुकता. तिने सुरवात केली वड्या करायला कि मी ओट्यावर वाटी घेऊन बसायचे, आणि सतत एकच प्रश्न "झाल्या का?" आई म्हणायची "अजून वेळ आहे, थांब जरा..". पुन्हा एक मिनिटांनी किंवा त्याहून कमी वेळात पुन्हा मी कढईत डोकावून विचारायचे "झाल्या का वडया?" आणि आईनी उत्तर द्यायच्या आतच वाटी समोर केलेली असायची, "दे ना थोडं", "अगं अजून तयार नाहीत.. इति आई", "असू दे, दे ना थोडस...". छळायची तिला मी. आईच उत्तर "अगं आधी देवाला नेवेद्य दाखवायचा मग खायचं". मी "लहान मुलं देवासारखीच असतात, असं तूच म्हणते ना... मग दे ना". शेवटी वडीचा प्रत्येक टप्पा मला चाखायला मिळायचाच. आज डोळ्यात फक्त पाणी होत वड्या माझ्या मी करतांना. छळायला ही कोणीच नव्हतं आणि आई देखील बाजूला उभी नव्हती. "लहानपण देगा देवा..." हेच खरं. आता फक्त त्या सर्व गोड आठवणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...