मंगळवार, १८ मे, २०२१

तर आज असं झालं...


आमच्या कडे दत्तजयंती निमित्य आणि सवाष्ण म्हणून ओटीत मिळालेले असे एकंदरीत नारळ एकत्र झाले. दोन नारळाच्या पोळ्या केल्या आणि बाकी तीन तरीही शिल्लक होते. म्हटलं आज सुट्टी आहे, उद्या दिनदर्शिकेप्रमाणे नवीन वर्ष देखील सुरु होत आहे, त्यानिमित्याने वड्या कराव्यात, नेहेमी पेक्षा थोड्या वेगळ्या. म्हटलं जरा पेढे घालावेत ह्यावेळी. मला तर हुकमी अजूनही गाडी काढून जाता येत नाही, मुलांना दूर पडेल चितळेंच दुकान, . मग काय हक्काचं स्विग्गी आलं कामात. पण बघते तर काय आज चितळे, मिठास सगळ्याची घरी पाठवण्याची तयारी नव्हती. नवीन वर्ष हे कारण असेल का?, कोणास ठाऊक. मग म्हटलं काय अजून पर्याय आहे. तर एक जवळचाच स्थानिक छोटासा मिठाई वाला दिसला स्विगी वर, पेढे शोधून मिळेनात त्याकडे, अजूनच आश्चर्य वाटलं.

वाटलं आज काही योग नाही दिसत आहे. पण मी सहज सोडून देणाऱयातली नाही. दादुज म्हणून एक महागडा मिठाई वाला आहे. त्याची जाहिरात दिसली आणि महद आश्चर्य म्हणजे नेहेमीच्याच दरात पेढे उपलब्ध होते, आणि घरपोच मिळाले देखील. मग मी आधी कढई ठेवली, बाकी सारी सामग्री घातली, वड्या थापण्या साठी ताट तयार केलं आणि मग पेढ्याचा डबा उघडला. केवढे सुबक सुंदर दिसणारे पेढे होते. अहाहा. नकोच वाटले कुस्करून घालायला, बघत बसावसं वाटलं त्या कडे. पण ना इलाज होता. सरते शेवटी अप्रतिम पेढयांच्या+नारळाच्या चविष्ट वड्या तय्यार झाल्या. "साठा उत्तराची कहाणी..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...