एवढ्यातच, सहज
गप्पा मधे
एका
अवलिया बद्दल माहिती मिळाली आणि
का कुणास ठाऊक लिहावंसं वाटलं. माझी त्यांची ओळख नाही, भेट तर नाहीच नाही.
ते जेव्हा अगदी लहान होते तेव्हा त्यांना पोलिओ झाला होता म्हणे. पण थोड्याच दिवसात ते अगदी बरे झाले आणि त्या नंतर अनेक वर्ष गाडी सुरळीत चालू होती. व्यवस्थित शिक्षण झाले, एस बी आय मधे नोकरी मिळाली, लग्न मुलं सगळं जवळपास २०-२२ वर्ष चालू होत. आणि अचानक पोलिओ नी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. त्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. आज २२ वर्ष ते घरात आहेत आणि वॉकर घेऊन घरात सगळं करतात. ते वाणिज्य शाखेतील विद्यार्थी इंजिनीयर नाहीत, तरी पण त्यांनी त्यांच्या वॉकरला त्यांच अक्षरश: घरच केलं आहे. प्रत्येक वस्तू साठी वेगळा कप्पा स्वतः तयार केला आहे, त्यात डायरी, पेन, पेन्सिल, खोड रबर, दूरदर्शन चा रिमोट, आणि इतर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठी काठी सारखी वस्तू देखील आहे. त्यांच्या वॉकर मधील कुठलीही वस्तू जर चुकून खाली पडली तर त्यांना अजिबात वाकता येत नसल्यामुळे त्यांनी एक चिमटा पण ठेवला आहे, लांब असा कि त्यात छोट्यातली छोटी वस्तू देखील उचलता येईल. कुठून येत असेल एवढी ऊर्जा? कमाल आहे. दिवसभर घरी कोणी नसतांना कोणावरहीअवलंबून नाहीत ते.
का कुणास ठाऊक पण माझा प्रार्थनेवर प्रचंड विश्वास आहे. म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे कि ह्या अवलियासाठी आपण रोज प्रार्थना करू यात, कि त्यांना अशीच ऊर्जा सतत मिळो. धन्यवाद.
मंगळवार, १८ मे, २०२१
थोडक्यात समजलेला अवलिया...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा